JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रात आणखी एका तरुणीने ड्युटीवरच केली आत्महत्या, गळफास घेवून संपवलं जीवन

महाराष्ट्रात आणखी एका तरुणीने ड्युटीवरच केली आत्महत्या, गळफास घेवून संपवलं जीवन

Ratnagiri Suicide : सदर महिलेकडे कोणतीही सुसाईड नोट न आढळल्याने त्यांनी हे पाऊल का उचललं, याबाबत गूढ निर्माण झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रत्नागिरी, 28 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर या पदावर असलेल्या एका महिलेनं ऑफिसमध्ये पंख्याला गळफास लावून ऑन ड्युटी आत्महत्या (Ratnagiri Suicide News) केली आहे. पूर्वी तुरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. सदर महिलेकडे कोणतीही सुसाईड नोट न आढळल्याने त्यांनी हे पाऊल का उचललं, याबाबत गूढ निर्माण झालं आहे. तसंच या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे घरगुती कारणांमुळे पूर्वी तुरे यांनी आत्महत्या केली की ऑफिसमधील कामाचा तणाव होता, हे तपासातून पुढे येईल . मात्र सध्या तरी पूर्वी तुरे यांच्या आत्महत्येवरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी नेहमीप्रमाणे पूर्वी तुरे (वय 25) या मुरुड येथील कार्यालयात कामानिमित्त गेल्या होत्या. त्यांचे पती सुशील तुरे हे हर्णै पोस्टात ड्युटीवर गेले. दुपारी दोघेही जेवायला घरी आले, मात्र पूर्वी तुरे न जेवताच झोपी गेल्या. सुशील हे दुपारी हर्णै पोस्टात जाऊन अडीच वाजता परत घरी आले. त्यानंतर पूर्वी या दापोली पोस्टात पैसे देवाण घेवाणीचे मशीन घेऊन जायचे असल्याचे सांगून निघून गेल्या. सुशील सायंकाळी मुलाला बैलगाडीतून फिरायला घेऊन गेले आणि साडेसातच्या दरम्यान परतले असता तरीही पूर्वी घरी आलेली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून मित्रासोबत दापोली येथील पोस्टात जाऊन पाहिले, पण तेथे ती आलेली नसल्याचे समजल्यावर हर्णै पोस्टात गेले. मात्र तिथेही त्या न आढळल्याने रात्री 10.15 च्या सुमारास मुरूड पोस्टात गेल्यावर मुरुड पोस्ट कार्यालयाचे दार आतून बंद असल्याचे लक्षात आले, तर सुशील यांच्या पत्नी पूर्वी यांची चप्पल बाहेर दिसून आली. हेही वाचा - शेतीच्या बांधावरून झालेला वाद गेला विकोपाला; खुरप्याने वार करून शेतकऱ्याची हत्या दार बंद होते, ते उघडण्याचा प्रयत्न करत असता आवाज ऐकून परिसरातील लोक तेथे आले. नंतर स्लाईडींग खिडकीवर उचलून आत प्रवेश करून पाहिले असता पोस्ट मास्तर पूर्वी तुरे या नायलन दोरीने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत आढळून आल्या. मात्र त्यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नसल्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात राहिले आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या