सातारा, 13 एप्रिल : महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कोरेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘‘खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचे आणि फिल्मी डायलॉगची क्रेझ आली आहे’’, असं म्हणत साताऱ्याचे खासदार उदयनराजेंची खिल्ली उडवली. ‘‘साताऱ्यातील प्रत्येक तरुण-तरुणी आता माझी सटकली आणि अपना टाईम आऐंगा असे डायलॉग बोलत आहेत. ज्या सातारा जिह्याने दिल्लीचं तख्त हलवलं, त्याच्यासमोर हे लोटांगण घालताहेत आणि तुम्हाला गुलाम बनवत आहे’’, असं आदित्य म्हणाले.