सातारा, 17 एप्रिल : लोकसभा निडणुकीकरता सध्या राज ठाकरे राज्यभर सभा घेत असून ते भाजपवर जोरदार हल्ला करत आहेत.निवडणूक लढवत नाही याचा अर्थ मी काहीही बोलू नये असा होत नाही. मी अन्यायाविरोधात बोलणार असा इशारा राज यांनी यावेळी भाजपला दिला. - अन्यायाविरोधात महाराष्ट्रानं कायम आवाज उठवला. - बेसावध राहू नका हे सांगण्यासाठी मी प्रचार सभा घेत आहे. - नरेंद्र मोदींनी पाच वर्षात एकही पत्रकार परिषद घेतला नाही. - नोटाबंदी दरम्यान मंत्र्यांवर अविश्वास का दाखवला? - नोटाबंदीनंतर 4 ते 5 कोटी लोकांचे रोजगार गेले. - भाजपकडे पैसा आला कुठून? - नोटाबंदीनंतर 7 स्टार कार्यालय बांधायला भाजपकडं पैसा आला कुठून? - निवडणुकांमधून पैसे वाटले जात आहेत. - सोशल मीडिया हा त्यांचा देखील बाप निघाला. - निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून पुलवामा हल्ला घडवला गेला का?. - पुलवामा हल्ल्यासाठीचं दहशतवाद्यांकडं RDX आलं कुठून? मोदीजी उत्तर द्या. - विरोधात असताना बोलणारे नरेंद्र मोदी आता काहीही का बोलत नाहीत? - नरेंद्र मोदींनी जवानांविरोधात केस दाखल केल्या. त्यांनी माफी मागायला लावलं. - जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणारी माणसं पक्षात कशी? - जवानांबद्दल आक्षेपार्ह बोलणारा परिचारक मोदींच्या अकलूज येथील सभेत कसा? - जवानांबद्दल मोदींच्या मनात काय हे कळलं. - नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं पाकिस्तानचे पंतप्रधान का सांगतात? काय ठरलं आहे? - निवडणुकीत इतर कोणतेही मुद्दे नकोत म्हणून सर्व घडवलं गेलं का? - जर 250 लोक मेले असते तर विंग कमांडर अभिनंदनला सोडला नसता. शिवाय, इम्रान खानला उभा जाळला असता पाकिस्तानमध्ये. - काळा पैसा बंद करायचा होता तर हजारची नोट बंद करून दोन हजारची नोट का आणली? तुम्हाला निवडणुकीमध्ये वाटायची म्हणून? - नरेंद्र मोदींनी 4500 कोटी जाहिरातींवर खर्च केले. - शहीद जवानांच्या, एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांच्या नावानं मत मागितली जात आहेत. मग पाच वर्षातल्या कामांवर का नाही बोलत? - हिटलर प्रमाणे सर्व चाललं आहे. - लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार हे या निवडणुकीमध्ये ठरणार आहे.