सातारा, 2 एप्रिल : साताऱ्याचे कवीफेम उमेदवार अभिजीत बिचकुले यांनी यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. उदयनराजे यांच्या विरोधात निवडणुकीला उभं राहून चर्चेत आलेल्या या कलंदर व्यक्तिमत्वाने यंदा प्रसिद्धीझोतात येण्यासाठी चक्क ‘चिल्लर डिपॉझिट’चा फंडा वापरला. उमेदवारी अर्ज भरतेवेळी 25 हजारांचं डिपॉजिट भरण्यासाठी हे महाशय चक्क दोन पिशव्या चिल्लर घेऊन अवतरले होते. यावेळी बोलताना ‘‘चिल्लर गोळा करणं हा माझा छंद आहे,’’ असं ते म्हणाले.