ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 6 मार्च: बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लातूरमधील वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. नुतन पोलीस निरिक्षक गणेश कदम यांनी बेशिस्त वाहनचालकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला. आतापर्यंत 5 हजार 389 जणांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 31 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई टाळायची असेल तर लातूरकरांना वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे. वाहनचालकांचे दूर्लक्ष लातूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस विभाग वेळोवेळी प्रयत्न करत आहे. मात्र वाहतुकीचे नियम आमच्यासाठी नाहीत अशा आवेशात वावणाऱ्या काही नागरिकांनी नियम पाळायचे नाहीत असे ठरवले आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध लातूर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. नुतन पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी वाहतूक शाखेचा पदभार हाती घेताच धडक मोहीम हाती घेतली आहे.
वाहतूक पोलिसांचे पेट्रोलिंग सन, उत्सवाचा व विद्यार्थाच्या परिक्षेचा काळ असल्याने शहरातील रस्त्यावर गर्दी वाढली आहे. वाहनचालकां सोबतच जिल्ह्यातून येणारे नागरिक बाजारपेठ व मुख्य रस्त्याने गर्दी करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना काही अडचणी येऊ नयेत म्हणून चौका चौकामध्ये पेट्रोलिंग सुरू केली आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून गर्दीच्या ठिकाणी मुख्य चौकात वाहतूक शाखेचे पोलिस पायी गस्त घालत आहेत. Latur News: 700 वर्ष जुन्या लातूरच्या ग्रामदैवताचा इतिहास माहिती आहे का? पाहा Video पोलिसांची धडक करावाई मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे चालकाविरुद्ध कारवाई केली जात आहे. चालक परवाना वाहनाची कागदपत्रे तपासली जात आहेत. दुचाकी गाडीचे आवाजाचे सायलेन्सर वापरणारे बुलेट चालक, चालू गाडीवर मोबाईलवर संभाषण करणाऱ्या चालकावर वाहतूक पोलीस कठोर कारवाई करीत आहेत. फेब्रुवारीत 1541 जणांवर कारवाई फेब्रुवारी महिन्यात अवैध प्रवासी वाहतूक, बुलेट सायलेन्सर, काळीपिवळी टॅक्सी, फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट वाहने, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या तसेच नो पार्किंग असलेल्या 1 हजार 541 वाहनचालकांवर केसेस करून 11 लाख 68 हजार 650 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई पुढेही सुरूच राहील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. Positive Story: बीडमध्ये अनोखा लग्न सोहळा, 21 HIV पॉझिटिव्ह जोडपी विवाहबंधनात, Video मागील दंडाची वसुली यापूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने ऑनलाइन दंड आकारण्यात आले होते. संबंधित वाहन चालकांनी सदरचा दंड भरणे अपेक्षित असतानाही त्यांनी दंड जमा केला नाही अशा एकूण 5 हजार 389 वाहन चालकाकडून 31 लाख 29 हजार मागील अनपेड दंड जमा करण्यात आला आहे. वाहन चालकांनी या सर्व बाबींची काळजी घेऊन वाहन चालवावे. जेणेकरून अपघातांची संख्या वाढणार नाही, असे आवाहन गणेश कदम यांनी केले आहे.