JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दीड एकर शेतीमध्ये केला नवा प्रयोग, दुष्काळी भागातील शेतकरी झाला लखपती! Video

दीड एकर शेतीमध्ये केला नवा प्रयोग, दुष्काळी भागातील शेतकरी झाला लखपती! Video

लातूरमधील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या शेतात वेगळा प्रयोग केला. त्यामुळे बरकत शेख हे लाखोंची कमाई करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 27 एप्रिल: मराठवाड्यातील मांजरा खोऱ्यातील माती आणि भौगोलिक हवामान रेशीम शेतीला अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे इथे रेशीम उद्योगाला सुगीचे दिवस येऊ शकतात. लातूर जिल्ह्यातील हरंगुळ येथील शेतकऱ्याने हेच ओळखून रेशीम शेती सुरू केली. केवळ दीड एकर रेशीम शेतीतून बरकत शेख हे एका हंगामत अडीच लाखांचे उत्पन्न घेत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा बरकत शेख यांचे कुटुंब 2020 पर्यंत पारंपारिक शेती करीत होते. गहू, हरभरा, ज्वारी आणि ऊस अशी पिके घेण्यावर त्यांचा भर होता. मात्र या पिकांसाठी खर्च जास्त आणि उत्पन्न तुलनेने कमी अशी अवस्था होती. गावातील इतर शेतकऱ्यांचीही हीच अवस्था होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेती करण्यास सुरुवात केली. त्यांना चांगले उत्पन्नही मिळू लागले.

रेशीम शेतीला सुरुवात रेशीम शेतीविषयी माहिती मिळाल्यानंतर 2020 मध्ये शेख यांनी एक एकरावर रेशीम शेती सुरु केली. पहिल्याच वर्षी चांगले उत्पन्न मिळाले. त्यामुळे शेख यांनी 2021 मध्ये रेशीम विकास कार्यालयाकडे नोंदणी केली. आपल्या दीड एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून रेशीम शेतीला पुन्हा सुरुवात केली. जून 2021 पासून त्यांनी आपल्या शेतात आतापर्यंत सहा पिके घेतली आहेत. रेशीम कोषाला चांगला दर रेशीम शेतीमधून शेतकऱ्यांना दर तीन महिन्याला एकरी 70 ते 80 हजाराचे उत्पन्न मिळते. गेल्या एक ते दीड वर्षात रेशीम कोषाला चांगला दर मिळाल्याने शेख यांना एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. त्यांनी रामनगर (बेंगलोर) येथील रेशीम मार्केटमध्ये विक्री केलेल्या रेशीम कोषांना प्रतिकिलो 745 रुपये दर मिळाला आहे. याठिकाणी चांगल्या प्रतीचे सुमारे 5 क्विंटल 22 किलो रेशीम कोष, तसेच डाग असलेले 26 किलो रेशीम कोषाची विक्री केली. त्यापोटी 3 लाख 50 हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. घरातील तेलाची गरज भागवण्यासाठी पिता-पुत्रांनी शोधली आयडिया, तुम्हीही घेणार का आदर्श? Video रेशीम शेतीमुळे लाखोंचे उत्पन्न आम्ही वाडवडिलांपासून पारंपारिक शेती करत होती. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी आणि ऊस अशी पिके घेतली जात होती. पण त्यामध्ये खर्च जास्त होत असे आणि तुलनेत उत्पन्न कमी मिळायचे. रेशीम शेतीविषयी माहिती मिळाल्यानंतर 2020 मध्ये एक एकरावर रेशीम शेती सुरु केली. आता दोन एकरावर रेशीम शेती करत आहे. दर तीन महिन्याला एकदा याप्रमाणे वर्षातून चार वेळा रेशीम उत्पादन होते. दर तीन महिन्याला एकरी सरासरी 70 ते 80 हजार उत्पन्न मिळते. मात्र गेल्या एक-दीड वर्षात रेशीम कोषाला चांगला दर असल्याने दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे, असे बरकत शेख यांनी सांगतिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या