JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur: ऑनलाईनच्या जमान्यात दिवाळीला दुकानातूनचं खरेदीला पसंती, VIDEO

Kolhapur: ऑनलाईनच्या जमान्यात दिवाळीला दुकानातूनचं खरेदीला पसंती, VIDEO

दिवाळीच्या काळात कोल्हापूरकरांनी बाजारपेठेत जोमाने खरेदी केली. यंदा दिवाळीच्या काळात 2019 च्या तुलनेत कोल्हापूरच्या व्यापारात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 28ऑक्टोबर : कोरोनानंतर सध्या सगळेच सण उत्सव धुमधडाक्यात साजरे होताना दिसत आहेत. कोरोनाचे सगळे निर्बंध हटवल्यानंतरची दिवाळी देखील नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली. या दिवाळीच्या काळात कोल्हापूरकरांनी बाजारपेठेत जोमाने खरेदी केली. यंदा दिवाळीच्या काळात 2019 च्या तुलनेत कोल्हापूरच्या व्यापारात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे व्यापार आणि उद्योग क्षेत्राला अतिशय चांगला प्रतिसाद या काळात मिळाला आहे, असं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आणि विक्रेत्यांना पावसामुळे बऱ्याच अडचणी आल्या. परंतु त्यातूनही नागरिक खरेदीसाठी गर्दी करत होते. दिवाळी हा खरेदीचाच उत्सव समजला जातो. त्यामुळे दोन वर्ष मनाप्रमाणे दिवाळी साजरी न करता येणाऱ्या नागरिकांनी यंदा मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी सहकुटुंब गर्दी केली होती. हेही वाचा :  कौतुकास्पद! विशेष मुलांनी दिवाळीत केली 6 लाखांची उलाढाल, VIDEO छोट्या विक्रेत्यापासून ते मोठ्या मॉलपर्यंत त्याचबरोबर ऑटोमोबाईल, सोन्या-चांदीची दुकाने, कपड्याची दुकाने, मिठाईची दुकाने, भेटवस्तूंची दुकाने तसेच घरे-प्लॉट व्यवसायाला देखील अतिशय चांगला प्रतिसाद यंदा ग्राहकांकडून मिळाला आहे. रेशन दुकानाच्या बाहेर आपण जशा रांगा बघतो तशा प्रकारच्या रांगा आम्हाला पाडव्यानिमित्त सोन्या-चांदीच्या दुकाना बाहेर बघायला मिळाल्या. कोरोनाच्या काळात जशी बूस्टर डोसची गरज होती. तसा बूस्टर डोस आम्हाला व्यापाऱ्यांना दिवाळी सणाच्या खरेदीच्या निमित्ताने मिळाला आहे, असंही ललित गांधी यांनी सांगितले. हेही वाचा :  Video : मिनी काश्मीर पर्यटकांनी गजबजलं, नौकाविहारासाठी वेण्णा लेकवर मोठी गर्दी यंदा दिवाळीनिमित्त आम्ही जनतेला आवाहन केलं होतं की तुम्ही दिवाळीची खरेदी ऑनलाईन न करता स्थानिक दुकानदारांकडून करा. आमच्या या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला बाजारपेठेत प्रचंड गर्दी असून देखील नागरिकांनी स्थानिक दुकानदारांकडून  खरेदी करण्यास प्राधान्य दिल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे सर्व व्यापारी वर्गातून सध्या समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे, असंही मत यावेळी गांधी यांनी व्यक्त केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या