JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rohit Pawar : ‘मी बेळगावात तर मंत्र्यांना जायला काय अडचण…’ रोहित पवारांचा सरकारला सवाल

Rohit Pawar : ‘मी बेळगावात तर मंत्र्यांना जायला काय अडचण…’ रोहित पवारांचा सरकारला सवाल

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सीमाभागावर वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर(ज्ञानेश्वर साळुंखे), 13 डिसेंबर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सीमाभागावर वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. दरम्यान यावर राज्यातील काही नेते सीमाभागातून बेळगावला जाणार असल्याचे सांगितल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 48 तासांचा अल्टीमेटम दिला होता. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आता बेळगावात गेले आहेत. ते बेळगावात गेल्यानंतर तेथील मुख्य असलेल्या राणी चन्नमा चौकात जाऊन फोटो शेअर केला आहे. याचबरोबर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे.

यावर रोहित पवार म्हणाले की, मी मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्दावर आरोप प्रत्यारोप केल्याचे ऐकत आहे. परंतु बेळगाव हा कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात असल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. बेळगावात माझे अनेक नातेवाईक राहतात यामुळे आमचे बेळगावशी नाते वेगळे आहे. दरम्यान शरद पवार साहेबांनी अल्टीमेटम दिल्यावर वातावरण शांत झाले आहे. मी आज बेळगावातील राणी चन्नमा चौकात जाऊन आलो  पण सत्ताधाऱ्यांनी हे धाडस करून दाखवावे असेही पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

जाहिरात

हे ही वाचा :  ..तर फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढणार; पंढरपूरमधील नागरिकांचा मोठा निर्णय

शरद पवार आणि सीमाभागातील बांधवांचे नाते जिव्हाळ्याचे असल्याने त्यांनी कर्नाटक सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला त्यानंतर बोम्मई सरकरला नरमाईची भूमिका घ्यावी लागली. दरम्यान 48 तासानंतर शरद पवार कधी जाणार विचारत होते त्यांच्या पार्टीचे मंत्री 6 डिसेंबरला गेले नाहीत. कर्नाटकच्या पत्रानंतर मंत्री जात नाहीत हा संदेश चुकीचा असल्याचेही पवार म्हणाले.

जाहिरात

कर्नाटक राजकारण डोळ्यासमोर ठेऊन पत्र लिहीत आहेत आणि मंत्री जात नाहीत हे चुकीचे आहे. पवार साहेबांना का गेले नाही विचारणारे त्यांचे मंत्री का गेले नाही याचा खुलासा करावा. असेही ते म्हणाले.

हे ही वाचा :  ठाकरे गटाला मोठा धक्का! महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीबाबतची ती मागणी फेटाळली

शरद पवारांना धमकीचा फोन

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली असून, कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यात आली आहे. तर दुसरीकडे फोन करणारा व्यक्ती हा वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या