JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Gokul Milk Rate : गोकुळचे दूध पुन्हा महागले, गायीच्या दुधात 3 रुपयांची वाढ

Kolhapur Gokul Milk Rate : गोकुळचे दूध पुन्हा महागले, गायीच्या दुधात 3 रुपयांची वाढ

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 डिसेंबर : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या  दरात वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा वाढ केली आहे. गायीच्या दूधामध्ये लिटरमागे गोकुळने 3 रुपयांची वाढ केली आहे तर आरदा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे.

गोकुळकडून ही दुधाची दरवाढ मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी तशी माध्यमात जाहिरात दिली आहे. आजपासून नवे दर लागू होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.

हे ही वाचा : एक फोन अन् मंदिर रिकामं , भाविकांमध्ये घबराट, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नेमंक काय घडलं?

संबंधित बातम्या

असे असतील दर

गोकुळच्या सर्व ग्राहकांना कळविण्यात येते की, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे संघामार्फत दिनांक 06-12- 2022 पासून (दिनांक 05- 12 -2022 च्या मध्यरात्रीपासून) मुंबई शहर व उपनगरे, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्हयामध्ये वितरीत होणाऱ्या गोकुळ दुधाच्या ग्राहक किंमतीत नाईलाजास्तव वाढ करण्यात येत असून, सदरचे सुधारीत दर खालीलप्रमाणे राहतील. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

हे ही वाचा :  मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका; चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्याआधी CM बोम्मईचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

गाय दूध (1 लिटर.) जुना दर 51, नवीन दर 54, गाय दूध (500 मिली.) 27 रुपये,  गोकुळ ब्रँडच्या फुल क्रिम दुधाच्या ग्राहक दरात बदल नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या