JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / करमुसे प्रकरणाला वेगळं वळण, भाजपचा गंभीर आरोप, जितेंद्र आव्हाड अडचणीत?

करमुसे प्रकरणाला वेगळं वळण, भाजपचा गंभीर आरोप, जितेंद्र आव्हाड अडचणीत?

राष्ट्रवादीचे कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माजी बॉडिगार्डनं जीवन संपवलं आहे. वैभव कदम असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात वैभव कदम हे आरोपी होते.

जाहिरात

आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या, करमुसे प्रकरणाला वेगळं वळण?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 29 मार्च : राष्ट्रवादीचे कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माजी बॉडिगार्डनं आयुष्य संपवलं आहे. वैभव कदम असं पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात वैभव कदम हे आरोपी होते. त्यांची या प्रकरणात पोलीस चौकशीही झाली होती. या तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. ‘स्वर मला माफ कर, साक्षी मला माफ कर, मी चांगला नवरा, बाप, मुलगा, भाऊ होऊ शकलो नाही. एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. माझ्या या निर्णयासाठी कुणालाही दोषी धरू नये असं व्हॉट्सअप स्टेटस वैभव कदम यांनी ठेवलं. वैभव कदम हे जितेंद्र आव्हाड यांचे माजी बॉडिगार्ड होते. वैभव कदम यांचा मृतदेह तळोजा ते पनवेलदरम्यानच्या रेल्वे लाईनवर आढळून आला. निळजे ते तळोजा दरम्यान स्वत:ला मेमो लोकलसमोर झोकून देत वैभवने बुधवारी सकाळी 9.05 वाजता त्यांनी ट्रेनसमोर उडी मारली. जितेंद्र आव्हाड आणि अनंत करमुसे यांच्यातील महाविकास आघाडी काळातील मारहाण प्रकरणात वैभव कदम हे महत्त्वाचे आरोपी होते. वैभव कदम यांनी या प्रकरणात माफीचा साक्षीदार व्हायचं ठरवलं होतं, त्यामुळे त्यांचा घातपात झाला असावा का? असा संशय भाजप नेते मोहित कंबोज यांनी व्यक्त केलाय. तसंच या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मोहीत कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात

वैभव यांची अनेक दिवसांपासून अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सतत चौकशी सुरू होती. याकरता ठाण्यात वैभवला यावे लागायचे. वैभव कदम यांनी रेल्वेसमोर उडी मारण्याआधी त्यांनी यासाठी कोणाला जबाबदार धरू नये, असं व्हॉटसअप स्टेससवर लिहिलं. पण अनंत करमुसे प्रकरणात त्यांच्यावर आरोप असल्याने आता जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होत आहे का तपास यंत्रणांना याचा फटका बसतोय? हे लवकरच स्पष्ट होईल. काय होतं करमुसे प्रकरण? अनंत करमुसे यांनी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले होते, त्यानंतर 5 एप्रिल 2020 ला त्यांना मारहाण झाली होती. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस तसंच बॉडिगार्डनी आपल्याला बंगल्यावर नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. यानंतर 6 एप्रिलला करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दिली. या मारहाणीवेळी वैभव उपस्थित असल्याचा आरोप झाला, तसंच एफआयआरमध्ये वैभवला आरोपी करण्यात आलं. करमुसे प्रकरणात वैभवची वारंवार चौकशी होत होती, त्यामुळे वैभव प्रचंड तणावाखाली होता, असं सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या