JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News : 20 रुपये किलो असलेला टोमॅटो अचानक महागला कसा? Ground Report

Jalna News : 20 रुपये किलो असलेला टोमॅटो अचानक महागला कसा? Ground Report

मिरची आणि टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडलंय. हे दर वाढण्याची कारणं काय आहेत?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जालना 3 जुलै :  मिरची आणि टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. किरकोळ बाजारात मिरचीला 200 रु. प्रति किलो इतका भाव मिळत आहे. तर टोमॅटोची 150 रु प्रतिकीलो या दराने विक्री होत आहे. त्यामुळे  टोमॅटो आणि मिरची खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. या दोन भाज्यांबरोबरत कोबी आणि आल्याचे दर देखील चढेच आहेत. पालेभाज्यांचे दर का वाढलेत याबाबत आम्ही जालन्याच्या बाजारातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काय कारणं सांगितली पाहूया शेती मशागतीची कामे आटोपून शेतकऱ्यांनी यंदा लवकरच शेत रिकामी केली. यामुळे शेतात असलेली भाजी पालापिके देखील नष्ट झाली. साहजिकच यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवाक घटली आहे. त्यातच असलेल्या भाजीपाल्याचं पावसानं नुकसान केलंय. इतर जिल्ह्यातून आलेला माल देखील अतिशय कमी आहे. तसंच स्थानिक मालामध्येही घट झालीय. त्यामुळे पालेभाज्यांचे दर वाढले आहेत, असा दावा व्यापाऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांना किती भाव? तुरळक शेतकऱ्यांकडे सध्या मिरचीचं पिक आहे. व्यापारी शेतावरच 50 रु किलो ने खरेदी करतात. ही मिरची मार्केटमध्ये ठोक 80 रुपये किलो दरानं विक्री करतात. हा माल मोठे व्यापारी घेतात आणि मंडीत येणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना 100 ते 110 रुपये किलोनं विकतात. तर किरकोळ व्यापारी ग्राहकांना 150 ते 200 रुपये किलोने विक्री करतात. दलालांची मोठी साखळी काम करत असल्यानं शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा मिळत नाही, अशी माहिती एका व्यापाऱ्यानं दिली. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत तयार केल्यानं शेतात माल राहिला नाही. त्यामुळे मिरचीची आवाज अतिशय कमी झाली असून त्याचे भाव वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी मिरचीचा दर 200 रुपये किलो होता. तो सध्या 100 रुपये आहे. नवीन माल येण्यास आणखी महिना लागणार आहे. त्यामुळे हे भाव चढेच राहतील, असं मिरची व्यापारी अनिल धांडे यांनी सांगितलं. 65 वर्षांच्या शेतकऱ्याची कमाल, शेतात केला नवा प्रयोग, कमी खर्चात मिळवलं लाखोंचं उत्पन्न जालना बाजारात टोमॅटोची फक्त एकच गाडी येत आहे. लोकल माल खूप कमी आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर देखील वाढले आहेत. सध्या मार्केटमध्ये टोमॅटोची 1 हजार ते 1700 रुपये प्रति कॅरेट या दराने विक्री होत आहे. भाव जास्त असल्याने ग्राहक वर्ग देखील कमी मिळत आहे, असं कारण व्यापारी फरहान बागवान यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या