JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News : जालन्याच्या दंगल गर्ल! वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतरल्या कुस्तीच्या आखाड्यात, पाहा Video

Jalna News : जालन्याच्या दंगल गर्ल! वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतरल्या कुस्तीच्या आखाड्यात, पाहा Video

जालन्याच्या दंगल गर्ल वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. यासाठी शेतात आखाडा तयार करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 18 जून : स्वतः मल्ल असलेल्या महावीर फोगाट यांचे देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्यानंतर तेच स्वप्न आपल्या मुलींकडून साकार करून घेणारी कहाणी आपण दंगल चित्रपटाच्या निमित्ताने पाहिली. पण अशीच एक कहाणी जालन्यात देखील साकार होतीय. मोठा कुस्तीपटू होण्याचे स्वप्न अधुरेच राहिल्याने प्रकाश अंभोरे तेच स्वप्न आपल्या मुलींकडून पूर्ण करून घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करून घेत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या शेतात आखाडा तयार केला आहे. स्वप्न राहिले अधुरे जालना शहरापासून 50 किमी अंतरावर असलेले पिंप्री हे प्रकाश अंभोरे यांचे गाव आहे. प्राची आणि ईश्वरी या दोन मुली त्यांना आहेत. प्रकाश अंभोरे  लहानपणापासून गावात कुस्त्या करायचे. मात्र सुविधांचा अभाव यामुळे मोठा कुस्तीपटू होऊ शकले नाहीत. ही सल त्यांच्या मनात कायम बोचत होती. लग्न झाल्यावर मुलगा झाल्यास त्याला आपण मल्ल बनवू असा त्यांचा विचार होता. परंतु, पहिली दोन्ही आपत्ये त्यांना मुली झाल्या. तरीही हार न मानत त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली.

शेतातच स्वखर्चाने तयार केला आखाडा शेतातच स्वखर्चाने त्यांनी आखाडा तयार केला असून साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या दोन मुली आणि गावातील 20 ते 25 मुला मुलींना ते दररोज कुस्तीचे धडे देत आहेत. त्यांची मोठी मुलगी प्राची ही दहावी वर्गात शिकत आहे. नगर जिल्ह्यात ती मॅट कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. गावाकडे मातीतली कुस्ती आणि नगर इथे मॅटची कुस्ती अशा दोन्ही प्रकारचा सराव तिचा होत आहे. तर त्यांचीच छोटी मुलगी जालना शहरात क्रीडा प्रबोधनी इथे शिकतेय. तिला देखील कुस्तीपटू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं अंभोरे सांगतात.

Sangli News: हा तर निघाला आमिर खानचा बाप; सांगलीतील होनमाने बंधूंनी काय केलं एकदा पाहाच, Video

संबंधित बातम्या

इंडियासाठी मेडल जिंकण्याचे माझे स्वप्न माझे वडील पूर्वी कुस्त्या करायचे. त्यांचे कुस्तीपटू व्हायचे स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून ते आम्हाला कुस्ती शिकवतात. मला पण कुस्तीची आवड लागलीय. गावाकडे आम्हाला ते आखाड्यांमध्ये घेऊन जायचे तिथे आम्ही अनेक आखाडे गाजवले. शालेय स्तरावर मी विभाग पातळीपर्यंत खेळले आहे. इंडियासाठी मेडल जिंकण्याचे माझे स्वप्न असल्याचं प्राची अंभूरे हिने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या