JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News : ड्रॅगन फ्रूट शेतीमधून शेतकरी मालामाल, एका एकरातच केली लाखोंची कमाई, Video

Jalna News : ड्रॅगन फ्रूट शेतीमधून शेतकरी मालामाल, एका एकरातच केली लाखोंची कमाई, Video

जालना जिल्ह्यातील शेतकरी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीमधून लखपती झालाय. पाहा त्यानं कशी केली किमया

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 19 जून :  लहरी निसर्ग, बाजार भावातील चढ उतार आणि सरकारी धोरणे याचा फटका शेतकरी वर्गाला नेहमीच बसत असतो. मात्र असे असतानाही काही शेतकरी न डगमगता आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करत राहतात. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केलाय. एक एकर ड्रॅगन फ्रूट शेतीमधून या शेतकऱ्याने तब्बल पाच लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. कसा केला साळेगाव येथील विठ्ठल डिखुळे यांनी हा प्रयोग पाहुयात. कशी झाली सुरूवात? जालना जिल्ह्यातल्या साळेगाव येथील शेतकरी विठ्ठल डिखुळे यांच्याकडे पाच एकर वडिलोपार्जित शेती आहे. एके दिवशी ते सोलापूर जिल्ह्यात काही कामानिमित्त गेले असता त्यांना माळरानावर लावली ड्रॅगन फ्रूटची बाग दिसली. घरी आल्यानंतर त्यांनी या फळविषयी आणखी चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर गावातीलच एका शेतकऱ्याने याची लागवड केली असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थित माहिती घेऊन आपल्या शेतावर ड्रॅगन फ्रूट लागवडीचा निर्णय घेतला.

डिखुळे यांनी 2019 साली गावातील शेतकऱ्यांकडूनच रोपं खरेदी करत एक एकरामध्ये 7 बाय 12 अंतरावर रोपांची लागवड केली. पोल आणि ठिबक सिंचनासाठी 2.5 लाख तर रोपं खरेदी करण्याठी 50 हजार असा एकूण तीन लाखांचा खर्च त्यांनी केला. ‘या लागवडीनंतर रोपांना फारशी किटकनाशक फवारावी लागली नाहीत. त्याचबरोबर खतांचाही मोठा खर्च आला नाही. केवळ शेणखत आणि एक-दोन वेळा ताक आणि गोमूत्र याची फवारणी घ्यावी लागते. अठरा महिन्यांनी पहिल्यांदा मला याचे 3 ते 4 क्विंटल उत्पादन मिळाले.  यंदा तिसऱ्या वर्षी मला 40 ते 45 क्विंटल उत्पादन झालंय,’ अशी माहिती डिखुळे यांनी दिली. आगरी डाळ वजरी अन् भेजा फ्राय खाल्ला का? एकदा हा VIDEO पाहाच मी स्वत: या फळांची मार्केटमध्ये विक्री करतो. त्यामुळे मला किरकोळ विक्रीतून 150 ते 200 रुपये किलो इतका दर मिळतो. यंदा एक एकर ड्रॅगन फ्रूट शेतीतून मला साडेचार ते पाच लाख उत्पन्न मिळालंय, असं विठ्ठल डिखुळे यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या