नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 5 जून : आपले शरीर तंदुरस्त राहावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. अनेकजण जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. काही योग करून शरीर आणि मनाची सांगड घालतात. तर काही लोक आहाराची पथ्ये पळून शरीर फिट ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना शरीराची देखभाल करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणूनच हल्ली वयाची 40 शी पार केल्यानंतर अनेक व्याधी जडतात. मात्र, वयाच्या 68 व्या वर्षी देखील पिळदार शरीर कमवनारे जालन्या चे कल्याण शिंदे तरुणाईसाठी आदर्श ठरत आहेत. कशी झाली व्यायामाची सुरुवात? जालन्यातील अंबड चौकी भागामध्ये कल्याणराव शिंदे राहतात. त्यांनी तब्बल 20 वर्षे शेती केली आहे. सध्या ते मुलाच्या व्यवसायात त्याला मदत करतात. लहान असताना त्यांची ताब्यात खूपच कमी होती. त्यामूळे वडील त्यांना दोन शर्ट घालायला सांगायचे. यामुळे तरी आपला मुलगा सदृढ दिसेल असं त्यांना वाटायचं. वडिलांची हीच कृती कल्याण शिंदे यांचा मनाला लागली. वयाच्या 18 व्या वर्षांपासून त्यांनी नियमित व्यायाम करण्यास सुरुवात केली. आजतागायत ते नियमित व्यायाम करतात. याच जोरावर त्यांनी तरुणांना लाजवेल अशी बॉडी कामवली आहे.
काय घेतात आहार 1977 पासून मी नियमित व्यायाम करतोय. कोरोनाची दोन वर्ष तेवढा खंड पडला. शेती करत असताना देखील मी पारंपरिक साधनाने व्यायाम करतच होतो. माझ्या या छंदाला घरातील सर्वांचा पाठिंबा आहे. माझा आहार हा पूर्णपणे शाकाहारी आहे. डिंकाचे लाडू, दूध आणि फळे असा आहार मी घेतो. तरुण मित्रांना माझे एवढेच म्हणणे आहे की त्यांनी इकडे तिकडे फिरण्या ऐवजी जिममध्ये येऊन व्यायाम करावा आणि आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे.
Tredmill or Walking : ट्रेडमिल की वॉकिंग? वजन कमी करण्यासाठी काय चांगलं?
माझे वजन 82 किलो आहे आणि उंची पाच फूट सात इंच. या वयात देखील मला कोणताही आजार नाही. मला कधी दवाखान्यात जायची देखील गरज पडत नाही. जिममध्ये येणाऱ्या तरुण मित्रांना मी नेहमी मार्गदर्शन करत असतो. मला अनेकांनी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला. पण मी एकदाही सप्लिमेंट घेतली नाही आणि भविष्यात देखील घेणार नाही. ईश्वर कृपेने सगळे ठीक राहिले तर यापुढे देखील की माझा छंद सुरूच ठेवणार असल्याचे कल्याण शिंदे यांनी सांगितले.