JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बडतर्फ केल्यानंतर जेलमधूनच झाला होता फरार, अखेर घरातून बाहेर पडताना पोलिसांनी केली अटक

बडतर्फ केल्यानंतर जेलमधूनच झाला होता फरार, अखेर घरातून बाहेर पडताना पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी आरोपीला राहत्या घरातून पळ काढत असताना झडप घालत अटक केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 29 नोव्हेंबर : जळगाव सबजेलमधून रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून 25 जुलै रोजी दुचाकीने फरार झालेल्या मुख्य सुत्रधार बडतर्फ पोलीस कर्मचारी सुशील मगरे याला आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास पहूर पोलिसांनी राहत्या घरातून पळ काढत असताना झडप घालत अटक केली आहे. 25 जुलै रोजी जळगावच्या कारागृहातून तीन कैदी फरार झाले होते. त्यात सुरक्षारक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून फरार असलेल्या मुख्य आरोपी सुनील मगरे यास स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस पथकाने ताब्यात घेतलं आहे. चार महिन्यापूर्वी जळगाव कारागृहातून हे कैदी पळून गेल्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस सुनील मगरे याच्या मागावर होते. सुनील मगरे हा निलंबित पोलीस असून त्याच्या विरोधामध्ये पुणे येथे तसेच जामनेर येथे रॉबरी, जबरी चोरीसह तीन गुन्हे दाखल आहेत. हेही वाचा - साईंच्या शिर्डीतून माणसं का होतात बेपत्ता? 3 वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर मगरे याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडील शस्त्रे हस्तगत केली आहेत. सुनील मगरे याला अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे आजच्या कारवाईनंतर जळगाव पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या