JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalgaon News : 'तुम्ही पुढे जा मी बाळासोबत आलेच..' मायलेकीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

Jalgaon News : 'तुम्ही पुढे जा मी बाळासोबत आलेच..' मायलेकीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

Jalgaon News : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे एका महिलेने आपल्या पाच महिन्याच्या मुलीसह जीवनयात्रा संवली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात

मायलेकीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 30 मे : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील विवाहितेने आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्यासह शेत शिवारातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आज उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? लासगाव येथील आरिफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांचे मामाची मुलगी लजिनाबी हिच्याशी झाला होता. लग्नानंतर या दाम्पत्यांना पुत्ररत्न प्राप्त होवुन त्याचे नाव असद ठेवण्यात आले. बोलता बोलता असद पाच महिन्याचा झाला. दरम्यान 28 मे 2023 रोजी गावात समाज बांधवातील लग्न असल्याने आरिफ शेख यांच्या परिवारास आमंत्रित करण्यात आले होते. आरिफ शेख हे परिवारासह लग्नात सहभागी होण्यासाठी गेले. मात्र, लजिनाबी यांनी सांगितले की, असद व मी थोड्यावेळात येतो. आरिफ शेख व त्यांचे आई, वडील लग्न समारंभात निघुन गेले. मात्र, खुप वेळ होवुनही लजिनाबी ह्या लग्नात पोहचल्या नाही.‌ यावेळी आरिफ शेख यांनी घर गाठले असता लजिनाबी व असद हे घरी नसल्याचे निदर्शनास आले. वाचा - Shocking News: लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीची ओढणी घेऊन गेला अन्.., नवरदेवाचं धक्कादायक पाऊल यावेळी लजिनाबी व असद यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. शेवटी हताश होऊन आरिफ शेख यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये लजिनाबी व असद यांची मिसिंग दाखल केली. दरम्यान आज 30 मे रोजी गावातील शेत शिवारातील विहीरीत लजिनाबी व असद यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस हे पथक व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करून लजिनाबी आरिफ शेख व असद आरिफ शेख यांचे मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या