प्रातिनिधीक फोटो
हिंगोली, 04 जानेवारी: हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव (Sengaon) तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील दाताडा बुद्रुक शिवारात एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या (Husband wife commits suicide) केली आहे. दोघांनी एकाच दोरीने एकाच झाडाला गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. रामदास इंगळे (वय-24) आणि शितल इंगळे (22) असं आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीची नावं आहेत. मृत रामदास यांनी दाताडा बुद्रुक शिवारात शेत घेतलं होतं. तेव्हापासून ते शेतातच वास्तव्याला होते. तीन महिन्यांपूर्वी पत्नी शितल या आपल्या माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे रामदास आपल्या आईसोबत शेतात राहात होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रामदास आपल्या पत्नीकडे सासरवाडीला गेले होता. पण त्यानंतर तो घरी परतला नाही. दाताडा शिवारात तो आपल्या पत्नीसह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. हेही वाचा- हृदयद्रावक! मरणानंतर एकत्र झालेच; नांदेडात प्रेमीयुगुलाने Whatsapp स्टेटस ठेवून लव्ह स्टोरीचा केला The End मृत रामदास यांचा तीन वर्षांपूर्वी विदर्भातील मडी येथील रहिवाशी असणाऱ्या शितल यांच्याशी झाला होता. त्यांनी अलीकडेच दाताडा बुद्रुक शिवारात शेत घेतलं होतं. त्यामुळे मृत रामदास आपली पत्नी आणि आईसोबत शेतातच राहात होता. तीन महिन्यांपूर्वी शितल आपल्या माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे रामदास आपल्या आईसोबत शेतातच राहत होता. हेही वाचा- ‘आई, मला माफ कर’ सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या, नाशकातील खळबळजनक घटना दोन दिवसांपूर्वी रामदास आपल्या पत्नीच्या गावी मडी याठिकाणी गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सोमवारी सकाळी दाताडा बुद्रुक शिवारात एका झाडाला दोन मृतदेह लटकल्याचं गावकऱ्यांना दिसलं. त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान याठिकाणी आलेल्या वाघजाळी येथील गावकऱ्यांनी संबंधित मृतदेह रामदास इंगळे आणि त्यांची पत्नी शितल इंगळे यांचा असल्याची माहिती दिली. या प्रकारानंतर स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केलं. संबंधित दाम्पत्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.