Home /News /nashik /

'आई, मला माफ कर...' सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या, नाशकातील खळबळजनक घटना

'आई, मला माफ कर...' सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या, नाशकातील खळबळजनक घटना

Suicide in Nashik: नाशिक येथील सिडको परिसरात एका 24 वर्षीय नवविवाहित महिलेनं टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.

नाशिक, 03 जानेवारी: नाशिक (Nashik) येथील सिडको परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 24 वर्षीय नवविवाहितेनं इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आयुष्याचा शेवट केला (Married woman commits suicide by jumping from terrace) आहे. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असता, विवाहितेनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट (Suicide note found) पोलिसांना सापडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. प्रियांका पगारे असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय नवविवाहितेचं नाव असून ती सिडको परिसरातील खटवडनगर येथील कृष्णा अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. प्रियांका हिने रविवारी सकाळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत जीवनाचा शेवट केला आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आसपासच्या अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. हेही वाचा- वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखलं; मुलींनीच आईला दिला खांदा, कारण वाचून पाणवतील डोळे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. 'आई, मला माफ कर, माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये' असा उल्लेख पीडित महिलेनं सुसाईड नोटमध्ये केला आहे. हेही वाचा-जन्मदात्यांसोबत क्रूरतेचा कळस; मुलाने कोयत्याने आईवर केले वार, बापाची छाटली बोटं मृत प्रियांका यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली? याची कोणतीही  माहिती अद्याप समोर आली नाही. अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Nashik, Suicide

पुढील बातम्या