JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने केले सपासप वार; हत्येच्या घटनेनं सातारा हादरलं!

डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने केले सपासप वार; हत्येच्या घटनेनं सातारा हादरलं!

Murder in Satara: सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी एका तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप (Attack with sword) वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात

रमेश रामचंद्र पवार असं हत्या झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. (File Photo)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कराड, 27 सप्टेंबर: सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी एका तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार (Attack with sword) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या सुमारास जीपमधून आपल्या गावी जात असताना, चार जणांनी रस्ता अडवून मृत तरुणाला गाडीतून बाहेर खेचून त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले आहे. कालच कराड शहरात एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच खुनाची (Murder in Karad) दुसरी घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रमेश रामचंद्र पवार असं हत्या झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो कोरगाव तालुक्यातील आर्वी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी दीपक शरद इंगळे आणि संदीप सुभाष इंगळे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रमेश आणि त्यांचा भाऊ नवनाथ दोघांचाही भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. हेही वाचा- धक्कादायक! बायकोच्या नाकाला चावा घेत पाडला तुकडा; कारण ऐकून पोलिसही चक्रावले गावातील एका महिलेसोबत मृत रमेश याचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून आरोपी दीपक इंगळे याने वाद घातला होता. 15 दिवसांपूर्वी वाद झाल्यानंतर हे प्रकरण मिटल्याचं वाटलं होतं. पण शनिवारी रात्री दहाच्या सुमारास चार जणांनी रमेश यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, काही क्षणातच रमेश रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडला, यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेही वाचा- पुण्यातील तरुणीला अमेरिकेला नेत अमानुष छळ; बँक खात्यातून परस्पर काढले 48 लाख याप्रकरणी दीपक शरद इंगळे आणि संदीप सुभाष इंगळे यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी कराड शहरात एका महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना ताजी असताना, लगेच दुसऱ्या दिवशी हत्येची ही थरारक घटना घडली आहे. त्यामुळे कराड परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या