JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर 22 फेब्रुवारी : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर (Ahmednagar-Aurangabad Highway) देवगड फाट्याजवळ एक भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. कार आणि ट्रॅव्हल्समध्ये झालेल्या या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीत मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे, की सोमवारी २२ फेब्रुवारीला पहाटे दोनच्या सुमारास अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस व औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या स्विप्ट कार यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहे. अपघातात कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस घुसल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. विवाह सोहळ्यात भलतीच गर्दी, अनेकांविरोधात गु्न्हे दाखल; खासदार-आमदारांही उपस्थित अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक अशोक नागरगोजे, पोलीस नाईक बबन तमनर,पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केलं आणि जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलवलं. परंतु सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या