JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING: अनिल देशमुखांविरोधात CBI ने दाखल केला FIR, 100 कोटी खंडणी प्रकरणात कारवाई

BREAKING: अनिल देशमुखांविरोधात CBI ने दाखल केला FIR, 100 कोटी खंडणी प्रकरणात कारवाई

FIR Against Anil Deshmukh: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 एप्रिल: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. खंडणी प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोल याठिकाणी असणाऱ्या घरांवर सीबीआयने छापेमारी केल्याची देखील माहिती समोर आली आहे. वरळी येथील सुखदा इमारतीत अनिल देशमुख यांचे घर आहे, त्या ठिकाणीही छापा घालण्यात आला आहे

संबंधित बातम्या

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग (former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयची विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या