JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / साप दिसला म्हणून दुचाकी सोडून काढला पळ, नागोबा घुसले थेट सीटाखाली, पाहा हा VIDEO

साप दिसला म्हणून दुचाकी सोडून काढला पळ, नागोबा घुसले थेट सीटाखाली, पाहा हा VIDEO

यावेळी शेतात नागाचा शोध घेतला असता नाग सापडला नाही. यावेळी नाग चुकून गाडीत गेला काय?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 17 फेब्रुवारी : साप (Snake) दिसला तर भल्याभल्यांची बोलती बंद होत असते. पण रस्त्यावर समोर आलेला साप पाहून पळून गेलेल्या तरुणाच्या दुचाकीच्या सीटमध्ये साप लपून बसला. अखेर, सर्पमित्राच्या मदतीने सापाला बाहेर काढण्यात आले. सांगलीच्या शिराळा येथील दिग्विजय शिंदे हे  त्यांच्या दुचाकी वरून आपल्या शेतात जात असताना त्यांना आपल्या पायाजवळ नाग असलेला आढळला. त्यांनी तशीच गाडी सोडून बाजूला झेप घेतली. त्यानंतर त्यांनी गाडीच्या आजूबाजूला बघितले असता त्यांना नाग आढळला नाही. त्यांनी त्यांचे सहकारी मित्र श्रीराम नांगरे पाटील, ऋषिकेश घोडे पाटील,बंधू राजेंद्र शिंदे यांना तात्काळ फोन करून बोलवून घेतले.

यावेळी शेतात नागाचा शोध घेतला असता नाग सापडला नाही. यावेळी नाग चुकून गाडीत गेला काय? ही शंका मनात आली असता तपासून बघितले असता नाग सीटच्या खाली असलेल्या पॅनलमध्ये अगदी दिसू नये. असा जाऊन बसला होता. यावेळी खूप प्रयत्न केल्या नंतर गाडीमधून या तरुणांनी नागाला बाहेर काढले व सुखरूपपणे त्याच्या अधिवासात सोडून दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या