JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोलीस पाटील व्हायचंय, मगं परीक्षा द्यावीच लागणार! वर्धा, हिंगणघाट, आर्वीत कसं आहे नियोजन?

पोलीस पाटील व्हायचंय, मगं परीक्षा द्यावीच लागणार! वर्धा, हिंगणघाट, आर्वीत कसं आहे नियोजन?

वर्धा जिल्ह्यातील विविध गावांतील पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी अनेक केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहेत.

जाहिरात

संग्रहित छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 4 जून : जिल्ह्यात विविध गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील नियुक्तीकरिता आता परीक्षा पद्धती अमलात आणली जात आहे. वर्धा, हिंगणघाट, आर्वी उपविभागात परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत, शांततेत पार पडण्याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस आणि जनतेतील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील. गावातील माहिती, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणे, शांतता, सुव्यवस्थेत मदत करणे, पोलीस यंत्रणेला आवश्यक सहकार्य करण्याची कामे पोलीस पाटलांकडून केली जातात. गावात पोलीस पाटलाचे पद महत्त्वाचे असून त्यांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. प्रशासन आणि जनतेतील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटलांची अनेक पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या त्या उपविभागात या परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. सर्व उपविभागांमध्ये एकाच दिवशी परीक्षा पार पडणार आहे. त्याकरिता प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. प्रशासनाने अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून केंद्रांचीही निवड करण्यात आली आहे. वाचा - One State One Uniform : शिक्षणमंत्र्यांची ‘ती’ योजना हवेतच? पालक, शिक्षक आणि विद्यार्थी अजूनही संभ्रमात जिल्ह्यात पाच जून रोजी दुपारी एक ते चार या वेळात ही परीक्षा संबंधित परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यामध्ये वर्धा, हिंगणघाट, आर्वी येथील उपविभागात ही परीक्षा होणार आहे. वर्धा उपविभागात पोलीस पाटलांच्या 76 जागा आहेत. त्याकरिता 420 अर्ज सादर करण्यात आले होते. त्यातील 352 अर्ज पात्र ठरलेत. वर्धा उपविभागाकरिता न्यू इंग्लिश हायस्कूल या केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. हिंगणघाट उपविभागात पोलिस पाटलांच्या 95 जागा आहेत. येथे 532 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यातील 484 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेत. येथील जीबीएम मोहता या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. आर्वी उपविभागात पोलीस पाटलांच्या 84 जागा रिक्त आहेत. आर्वी उपविभागात 617 पैकी 554 अर्ज पात्र ठरलेत. येथील नगर परिषद गांधी विद्यालय, मॉडेल हायस्कूल आणि जि.प. कन्या शाळा परीक्षा केंद्रात परीक्षा होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या