JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : शिवसेनेला आता फक्त पुढच्या 21 तासांची मुदत, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत प्रचंड घडामोडी

BREAKING : शिवसेनेला आता फक्त पुढच्या 21 तासांची मुदत, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत प्रचंड घडामोडी

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगात आज शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत फैसला होणार होता. पण शिवसेनेच्या बाजूने निवडणूक आयोगात कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आला. मात्र निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळली. तरीही निवडणूक आयोगाने उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ शिवसेनेसाठी दिला आहे.

जाहिरात

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रशांत लिला रामदास, नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक पक्ष असलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात पक्षाचं चिन्ह आणि हक्कावरुन संघर्ष सुरु आहे. त्यांच्या या संघर्षावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगात पक्षाच्या चिन्हावरुन आज महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष सदस्यात्वाचे तब्बल सात लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. शिंदे गटाने आज कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रचंड धावाधाव केली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे गटाकडूनही कागदपत्रे सादर करण्यासाठी धावाधाव सुरु आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला. निवडणूक आयोगाने मात्र ठाकरे गटासाठी उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. महराष्ट्राच्या राजकारणासाठी या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज दोन्ही गटाने कागदपत्र सादर केले. यामध्ये शिंदे गटाने सकाळी निवडणूक आयोगात सर्व कागदपत्रे दिली. तर उद्धव ठाकरेंच्या वतीने दुपारी जेष्ठ वकील देवदत्त कामत यांच्या माध्यमातून कागदपत्र सादर करण्यात आली. खरंतर दोन्ही गटासाठी ही लढाई ‘करो या मरो’ या स्वरुपाचीच आहे. शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्षचिन्हावर आज निवडणूक आयोगात अंतिम सुनावणी होईल, असा अंदाज होता. पण शिवसेनेकडून आणखी मुदतवाढ मागण्यात आल्याने निवडणूक आयोगाने उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ शिवसेनेला दिला. त्यामुळे उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेनेला आपली बाजू मांडता येणार आहे. ( ‘पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट’, बॉम्बस्फोटाची धमकी, पुण्यात एकाला बेड्या ) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना उद्या (शनिवारपर्यंत) अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे काही तास उरले आहेत. उद्या दुपारपर्यंत जर सर्व संबंधित कागदपत्रे सादर केली नाहीत, तर निवडणूक आयोग पुढील कार्यवाही करेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने 4 ऑक्टोबरला शिवसेनेसंबंधित सर्व कागदपत्रे मागितली होती. पण आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाकडून फक्त कार्यकारिणीच्या सदस्यांची नावं देण्यात आली आहेत. इतर नोंदणी पत्र देणं अद्याप बाकी आहेत. 14 ऑक्टोबर 2022 ही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी धनुष्यबाण निवडणुक चिन्हाचा निर्णय जाहीर करणं अनिवार्य आहे. त्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होती. ठाकरे गटाकडून कार्यकारिणीची कागदपत्रे जरी सादर करण्यात आली असली तरी, इतर शपथपत्रे सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आली आहे. पण निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याची शेवटची मुदत दिली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणुक आयोग उद्या दुपारी 2 पर्यंत ठाकरे गटाकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नाही तर केंद्रीय निवडणुक आयोग पुढील कार्यवाही सुरू करणार. दरम्यान, निवडणूक आयोग शिवसेनेच्या चिन्हाबद्दल उद्या कदाचित निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावतीने वारंवार निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागविण्यात येतोय. निवडणूक आयोगानेही ठाकरे यांच्या गटाला वेळ दिला. पण ठाकरे यांच्या गटाला आणखी काही आठवड्यांचा वेळ हवा होता. पण ती मागणी आता निवडणूक आयोगाने आज फेटाळली आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या आजच्या सुनावणी आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल निवडणूक आयोगाकडे अर्ज पाठवला होता. त्या अर्जात त्यांनी उद्धव ठाकरेंचा गट वेळकाढूपणा करत असल्याची टीका शिंदेंनी केली आहे. या अर्जात शिंदेंनी ठाकरे गट धनुष्यबाण या चिन्हाचा गैरवापर करत आहे, तसंच निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर न करता वेळकाढू पणा करत असल्याचा आरोप केला आहे. आम्ही 1,50,000 पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, यात लोकप्रतिनधी आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा शिवसेना पक्षाच्या सदस्यांचा आम्हाला असलेल्या पाठिंब्याचा पुरावा आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना सदस्यांचा पाठिंबा असल्याचं एकही पत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेलं नाही. आम्ही प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन प्रस्ताव मंजूर करून घेतले, पण ठाकरे गटाकडून अशा बैठका झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असंही शिंदेंनी त्यांच्या या अर्जात म्हणलं आहे. शिंदेंकडून 4 ऑक्टोबरला हा अर्ज आणि प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या