JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : फुटबॉल मॅचदरम्यान भूकंपाचे धक्के! 6.4 रिश्टर स्केल तीव्रता, एक खेळाडू जखमी

VIDEO : फुटबॉल मॅचदरम्यान भूकंपाचे धक्के! 6.4 रिश्टर स्केल तीव्रता, एक खेळाडू जखमी

मॅच सुरू असताना अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने एक खेळाडू खाली कोसळला आणि जखमी झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पनामा : फुटबॉलची मॅच सुरू असताना भूकंपाचे तीव्र धक्के जाणवायला लागले. स्टेडियममधे असलेले पोल देखील हलायला लागले. स्टेडियममध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मॅच सुरू असताना अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने एक खेळाडू खाली कोसळला आणि जखमी झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. मध्य अमेरिकन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कोस्टा रिका आणि पनामा इथे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. 6.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या मते, कोस्टा रिकाची राजधानी सॅन जोस येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ज्याचे केंद्र 31 किमी खोल होतं.

Sikkim Avalanche : सॅल्यूट! 23 लोकांना मृत्यूच्या दाढेतून जवानांनी काढलं बाहेर, पाहा रेस्क्यूचा थरारक VIDEO

संबंधित बातम्या

पनामाच्या किनारपट्टीवर 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठं नुकसान झाल्याची सध्या तरी कोणती माहिती समोर आली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू चिरीकी प्रांतातील बोका चिकाच्या दक्षिण दिशेला 72 किमी अंतरावर होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या