'व्हॉट्सअप चॅटमध्ये आर्यन आणि अरबाज मर्चंट किंवा तिघांनीही इतर आरोपींसोबत एनसीबीने आरोप केल्यानुसार कोणताही कट रचला हे असे आक्षेपार्ह काहीही प्रथमदर्शनी तरी दिसत नाही'
मुंबई, 20 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी (mumbai drug case) अंमली विरोधी पथकाने मोठा गाजावाजा करत सुपरस्टार शाहरुख खान (sharukh khan) याचा मुलगा आर्यन खानला (aryan khan arrest case) अटक केली होती. पण, हायकोर्टाने (high court) त्याला जामीन मंजूर करून NCB ला पहिला धक्का दिला. आता, आर्यन खान या तिघांकडे आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याकडे अंमली पदार्थ सापडले नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे समीर वानखेडे (sameer wankhede) यांना मोठा धक्का बसला आहे. हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करत असताना आर्यन खानच्या जामिनावर निकाल देताना मुंबई हायकोर्टाने नोंदवले महत्वपुर्ण निरीक्षण आता समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे यांनी ही निरीक्षण नोंदवली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याकडे कमर्शिअल क्वांटिटीमध्ये अंमली पदार्थ सापडलेत असं प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे हे या टप्प्यावर सांगणे कठीण आहे, असं कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. ऐन लग्नसराईतच वाढणार रेडिमेड कपड्यांचे दर,5 टक्क्यांवरुन वाढून 12% होणार GST दर तसंच, त्यांनी गुन्हेगारी षडयंत्र रचले आहे असे अनुमान काढण्यासाठी कोणतेही आधारभूत कारण सध्या तरी दिसत नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे. एनसीबीने आर्यन खानच्या फोनमधून घेतलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा दाखल देत तो कटात सहभागी असल्याचा दावा केला होता. पण, या चॅटमध्ये आर्यन आणि अरबाज मर्चंट किंवा तिघांनीही इतर आरोपींसोबत एनसीबीने आरोप केल्यानुसार कोणताही कट रचला हे असे आक्षेपार्ह काहीही प्रथमदर्शनी तरी दिसत नाही, असंही निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं आहे. अंकिता लोखंडेच्या केळवणासाठी ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींची स्पेशल तयारी आर्यन खानला 28 ॲाक्टोबरला जामीन मिळाला होता. त्या जामिनाच्या आदेशाची प्रत आज जाहीर करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या या निरीक्षणामुळे एनसीबीने केले सर्व आरोप हे एका प्रकारे खोटे ठरले आहे, त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे.