विशाल रेवडेकर, देवगड, २३ जुलै : देवगड तालुक्यातील पुरळ गावात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करत घराच्या गॅलरीत झोपलेल्या कुत्र्यावर झडप घातली. या कुत्र्याला घेऊनच हा बिबट्या पसार झाला. हा सगळा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. भर वस्तीत असा प्रकार घडल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुरळ इथल्या शैलेश मराठे यांच्या घराच्या गॅलरीत दोन कुत्रे बांधून ठेवले होते. शुक्रवारी रात्री बिबट्याने त्या कुत्र्यांवर हल्ला केला. गॅलरीला असलेल्या लोखंडी दरवाजावरून उडी मारत थेट कुत्र्याच्या दिशेने झेप घेतली. यावेळी एका कुत्र्याला तोंडात धरून बिबट्या घेऊन गेला. दुसऱ्या कुत्र्यावरही त्याचा हल्ल्याचा प्रयत्न होता पण तो यशस्वी ठरला नाही. Viral Video : पाण्यात पाय टाकून बसला होता व्यक्ती; इतक्यात मगर आली अन्…, काय केलं पाहा
पुरळ आणि परिसरात आतापर्यंत अनेक पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. भर वस्तीत बिबट्या घुसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यामुळे रात्रीचे कोणीही नागरिक घराबाहेर पडत नाहीत. सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी ग्रामस्थांनासुद्धा या बिबट्याचे दर्शन होते. आता बिबट्याने हल्ला करत कुत्रा नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.