JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आता CBI च्या हाती, केंद्राकडून नोटिफिकेशन जारी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आता CBI च्या हाती, केंद्राकडून नोटिफिकेशन जारी

रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंबीय अशा सहा जणांविरुद्ध गंभीर आरोप

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Suicide) कथित आत्महत्या प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI च्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सांगितलं की, बिहार सरकारने या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्राने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI करणार आहे. हेही वाचा… कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाली..आधी वडिलांना विचारा 7 प्रश्नांची उत्तरं दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवा तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल. रिया चक्रवर्तीसह 6 जणांवर गुन्हा… सुशांत सिंहचे वडिल केके सिंह यांनी (वय-74) यांनी 28 जुलैला अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंबीय अशा सहा जणांविरुद्ध पाटणा येथील राजीव नगर पोलीसमध्ये एफआयआर नोंदवली आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका रिया चक्रवर्तीवर ठेवण्यात आला आहे. केके सिंह यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. बिहार पोलीस या प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले होते. मात्र, बिहार सरकारने केंद्र सरकारकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. रियाने आपलं करिअर घडवण्यासाठीच मे 2019 सुशांतशी मैत्री केली होती. हेही वाचा... सुशांत सिंह राजपूत प्रकरणी SC ने मुंबई पोलिसांना 3 दिवसांत मागितला अहवाल 14 जूनला सुशांतनं केली होती आत्महत्या… दरम्यान, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याने वांद्रये येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, पोलिसांना आतापर्यंत कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या