JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिलासादायक! पंढरपूरची धारावी 'महापूरचाळ' अवघ्या 15 दिवसांत झाली कोरोनामुक्त

दिलासादायक! पंढरपूरची धारावी 'महापूरचाळ' अवघ्या 15 दिवसांत झाली कोरोनामुक्त

या सर्व गोष्टींना धक्का देत येथील कष्टकरी दिनदलीत मजूर वर्गांनी ह्या सगळ्या गोष्टीवर नियोजनबद्ध पद्धतीने मात करीत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली

जाहिरात

काही कोरोना रुग्णांमध्ये त्वचा कोरडी पडणे आणि खाज सुटणे असेही लक्षणे दिसून आली होती.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 25 जुलै: कष्टकऱ्यांची, मजुरांची ‘धारावी’ म्हणून संबोधली जाणारी पंढरपुरची ‘महापूर चाळ’ अवघ्या 15 दिवसांत कोरोनामुक्त झाली. तेथील कष्टकऱ्यांनी, समाजसेवकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खरोखरच करून दाखवलं आहे. 15 दिवसांपूर्वी महापूरचाळ झोपडपट्टीत कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर करोनाबाधित होणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात होती. हेही वाचा… सोशल मीडिया स्टार आजीची थेट गृहमंत्र्यांनी घेतली भेट, साडी-चोळीसह दिली सव्वा लाखांची मदत झोपडपट्टी परिसर म्हणजे दुर्गंधी, अस्वच्छता , उदासीनता आणि समन्वयाचा अभाव असे चित्र कल्पित केले असल्याने थोड्याच दिवसात तो भाग पंढरपूर मधील हॉटस्पॉट ठरणार अशी सर्वांची अटकळ बांधली होती. परंतु या सर्व गोष्टींना धक्का देत येथील कष्टकरी दिनदलीत मजूर वर्गांनी ह्या सगळ्या गोष्टीवर नियोजनबद्ध पद्धतीने मात करीत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. सर्वप्रथम करोनाबाधित संशयित रुग्ण व त्यांच्याशी संपर्क आलेले व्यक्तीचे वर्गीकरण करून त्यांना संस्थात्मक व घरगुती विलिनीकरण करण्यात आले. तसेच नेमका संभावीत भाग लक्षात तो सील करण्यात आला. चळवळीतून तयार झालेल्या नगरसेवक कृष्णा वाघमारे यांच्या नेतृत्त्वाखाली टीम तयार करुन अत्यावश्यक सेवा पुरविणारी यंत्रणा तयार करण्यात आली. डॉ.आण्णासाहेब रणदिवे यांनी संपूर्ण भागाला पुरेल एवढा आर्युवेदिक काढा बनवून त्याचे रोजच्या रोज वाटप करण्यात आले. आमदार प्रशांत परिचारक हे वेळोवेळी मार्गदर्शन करून सुचेना देत असत व प्रांताधिकारी सचिन ढोले सह सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजनबद्ध काम केल्याने महापूर चाळ अवघ्या पंधरा दिवसात करोनामुक्त झाली. हेही वाचा… 5 वर्षांच्या मुलासाठी सोनियाने स्कुटीवरून केला मुंबई-जमशेदपूर 1800 किमी प्रवास कोव्हिड सेंटर मधुन परतलेल्या सर्व योध्द्यांचे जंगी स्वागत करत असताना जग जिंकेल्याचा आनंद प्रत्येकांच्या तोंडावर दिसत होता. कष्टकऱ्यांच्या पंढपूरची ‘धारावी’ ने कोरोनावर मात करण्याचे काम करून स्वतंत्र मॉडेल समोर आलं असल्याची नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या