JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोना पॉझिटिव्ह आई-मुलीचा घरातच मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

कोरोना पॉझिटिव्ह आई-मुलीचा घरातच मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

मुलगी सुरेखा पाचखंडे ही गेल्या काही दिवसांपासून आजारीच होती. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 03 मे : महाराष्ट्रात कोरोनाने (Maharashtra Corona) थैमान घातले आहे. रुग्णालयांमध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे, तर काही जण घरीच उपचार घेत आहे. पण, घरी उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आई-मुलीचा घरातच मृत्यू झाला असून  दोघींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत घरात आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नाहीत. वर्ध्यात पॉझिटिव्ह असणाऱ्या मायलेकीचा करुण अंत झाल्याची घटना उघडकीस आलीय. समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी घरातच आई- मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुभद्रा डोमाजी मांडवकर (80) व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे (45) अशी मृतांची नावे आहेत. मृत आई व मुलगी कुटुंबीयांपासून वेगळ्या राहत असत. शासकीय रुग्णालयात दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. IPL 2021: KKR च्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण, RCB विरुद्धच्या मॅचवर मोठं संकट या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. कोविड बाबतची दक्षता घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. सुभद्रा आणि सुरेखा या मायलेकींचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. मुलगी सुरेखा पाचखंडे ही गेल्या काही दिवसांपासून आजारीच होती. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नाहीत, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याचे लक्षात येताच घरात जाऊन पाहिले असता दोघांचंही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. उपचारासाठी आकारले लाखो रुपये, पुण्यातील सरकारी रुग्णालयाचा गलिच्छ कारभार जिल्ह्यात सध्या कोरोनाबधितांचा आणि मृतकांचा आकडा वाढत आहे. अशातच अनेक रुग्ण तपासणी न करता घरीच राहत आहे. राज्यात एप्रिल महिन्यात कोरोना मृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली आहे, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे कोरोना बळींच्या संख्येत कमालीचा उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या