JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेनंतर काँग्रेसलाही धक्का, प्रवक्ता कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात!

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेनंतर काँग्रेसलाही धक्का, प्रवक्ता कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात!

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेनंतर (Shivsena) आता काँग्रेसलाही (Congress) धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा देत कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जुलै : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेनंतर (Shivsena) आता काँग्रेसलाही (Congress) धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा देत कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. सावंत यांनी मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. अरुण सावंत (Arun Sawant) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला लागलेली गळती अजून सुरूच आहे. शिंदे यांनी सगळ्यात पहिले शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांना फोडलं, ज्यामुळे महाविकासआघाडी सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनीही शिंदे गटात सहभाग नोंदवला. आमदार खासदारांप्रमाणेच शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील शिंदेंना पाठिंबा देत आहेत.

शिवसेनेपाठोपाठ आता युवासेनेतही राज्यभरात उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. राज्यभरातील युवासेनेचे 40 वरिष्ठ पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात गेले आहेत. खोतकर शिंदे गटात दरम्यान जालन्याचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे खोतकरही शिंदे गटात सामील होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीलाही खिंडार? शिवसेना-काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीलाही खिंडार पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन‌ पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राजन पाटील हे माजी आमदार आहेत. तर, बबनदादा शिंदे हे माढा मतदारसंघाचे आमदार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या