JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बारसू पुन्हा पेटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

बारसू पुन्हा पेटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

बारसू रिफायनरी प्रोजेक्टचा वाद आणखी चिघळला आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आलेले कर्मचारी आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली.

जाहिरात

बारसूमधलं वातावरण तापलं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजापूर, 28 एप्रिल : बारसू रिफायनरी प्रोजेक्टचा वाद आणखी चिघळला आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आलेले कर्मचारी आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली, तसंच पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोपही केला जात आहे. तर सकाळीच ठाकरे गटाचे स्थानिक खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया बारसूमधल्या तापलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी स्वत: उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी बोललो आहे. दहा ते पंधरा मिनिटं नागरिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. लाठीचार्ज झालेला नाही, ते भूमीपूत्र आहेत. काही लोक स्थानिक आहेत, काही बाहेरून आलेले आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करून जोर जबरदस्तीने काहीही होणार नाही,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ‘जे लोक विरोधात आहेत, त्यांना प्रकल्पाबाबत माहिती देण्यात येईल, तसंच फायदे समजावून सांगण्यात येतील. गावकऱ्यांना शांततेचं आवाहन आहे, कुठलीही जोरजबरदस्ती सरकार करणार नाही,’ असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या

‘तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना हा प्रकल्प करण्याबाबत पत्र लिहिलं होतं. राजकारणासाठी राजकारण करू नका. एकीकडे उद्योग दुसरीकडे जात असल्याची टीका करायची आणि दुसरीकडे प्रकल्पाच्या विरोधात भूमिका का? 100 टक्के लोकांचा विरोध असता तर समजू शकलो असतो. मात्र 70 टक्के लोक सोबत असल्यानेच तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ‘छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना शाप देणार’, ‘बारसू’च्या राड्यावरून राऊत मुख्यमंत्र्यांवर संतापले ‘मी उद्योगमंत्र्यांना सर्व नागरिकांशी चर्चा करायला सांगितलं आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना चर्चेला बोलवा. संवाद साधा, आपल्याला कोलांच्या विरोधात जाऊन हा प्रकल्प करायचा नाही. त्यांना सोबत घेऊनच हा प्रकल्प करायचा आहे,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. CM Eknath Shinde, Barsu

बारसूमधलं वातावरण तापलं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या