JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वाहन चालकाच्या बेफिकिरीमुळे चिंकाराने गमावला जीव, वनविभाग उचलणार महत्त्वूपर्ण पाऊल

वाहन चालकाच्या बेफिकिरीमुळे चिंकाराने गमावला जीव, वनविभाग उचलणार महत्त्वूपर्ण पाऊल

पुणे-नाशिक मार्गावर पूर्वेकडून पश्चिमेकडे रस्ता पार करत असताना अज्ञात वाहनांची धडक या प्राण्याला बसली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 31 जानेवारी : पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंकारा या प्राण्याचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील सांडभोरवाडीच्या हद्दीत दुपारी पुणे-नाशिक मार्गावर पूर्वेकडून पश्चिमेकडे रस्ता पार करत असताना अज्ञात वाहनांची धडक या प्राण्याला बसली. यामध्ये त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याने चिंकाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच खेड वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून खरपुडी येथील रोपवाटीकेत त्याच्यावर शवविच्छेदन करून अग्निदहन करण्यात आले. हा चिंकारा अंदाजे 5 ते 6 वर्षांचा असल्याची माहिती खेड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कासारे यांनी दिली आहे. यावेळी घटनास्थळी वनपाल आर .गोपाळे, वनमजूर के.काळे.एस.सांडभोर उपस्थित होते. हेही वाचा - VIDEO : खेडमध्ये लहान मुलांचं भविष्य करपवण्याचा प्रयत्न, बेकरीत सुरू होती पिळवणूक वनविभाग उचलणार महत्त्वूपर्ण पाऊल मागील दोन दिवसात दोन वन्यप्राण्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला असून या भागात वनविभागाकडून जनजागृती करण्यात येणार आहे. परिसरात वाहन चालकांच्या माहितीसाठी फलक लावण्यात येणार आहे. तर वाहन चालकांनी अशा ठिकाणी वाहने सावकाश चालविण्याचं आवाहन वन विभागाने केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या