sambhaji nagar
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर : देशभरात श्रीराम नवमीचा उत्साह सुरू आहे. श्रीराम नवमी निमित्ताने आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचा आयोजन देखील करण्यात आलं आहे. या दरम्यान एक धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली. समाजकंटकांनी वाहानं पेटवल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. किराडपुरा भागात राम मंदिर आहे. समाजकंटकाने रस्त्यावर मंदिराशेजारी उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अफवा पसरली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी या परिसरात जाऊन सगळ्यांना आवाहन केले. या भागात सर्व सुरळीत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
इम्तियाज जलील अतुल सावे प्रदीप जयस्वाल आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्वत: मंदिरात कोणतीही हानी नाही असं लोकांना सांगितलं आहे. मंदिरा बाहेर काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि काही वाहन ही जाळली. मंदिराच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही असं सांगण्यात आलं आहे.