JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, आईनं मोलमजुरी करून दिलं शिक्षण, पीएसआय बनतं सुनीलनं साकारलं स्वप्न Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, आईनं मोलमजुरी करून दिलं शिक्षण, पीएसआय बनतं सुनीलनं साकारलं स्वप्न Video

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करू सुनील गोर्डेने आपल्या आईचं स्वप्न साकारलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 5 जुलै : लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, त्यानंतर आईनं आपल्या दोन्ही मुलांना कष्टानं मोठं केलं. मुलानेही जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या आईचं स्वप्न साकारलं आहे. नुकत्याच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथील सुनील गोर्डे या तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. कसं मिळवलं यश? सुनील गोर्डे याचे वडील आण्णासाहेब गोर्डे यांचे निधन तो चार वर्षाचा असतांना झाले. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्याची आई अलकाबाई गोर्डे यांनी आपल्या माहेरी (आगलावे गेवराई ) येथे राहून आपल्या दोन्ही मुलांना मोलमजुरी करून शिक्षण दिले. सुनीलचे पहीली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई बुद्रुक येथे झाले. तर आठवी ते दहावी पिंपळगाव पांढरी येथील शारदा महाविद्यालय येथे तर अकरावी ते बारावी आडुळ येथील कन्या महाविद्यालायत तर आडुळ येथेच पदवीपर्यंत शिक्षण झाले. आईसोबत काम करत शिक्षण घेत त्याने अभ्यास केला.

सुनीलने 2017 पासून बीए शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. फ्रेबुवारी 2020 रोजी त्याने फॉर्म भरून अभ्यासाचे नियोजन करीत परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात तो पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उत्तीर्ण झाला. सुनीलने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आहे.

Top Freelancing Websites: अवघ्या एका दिवसात 1 लाख रुपये कमवायचे आहेत? मग ‘या’ टॉप वेबसाईट्स बघितल्या का?

संबंधित बातम्या

आईच्या कष्टाचे सार्थक झाले लहानपणापासून पोलीस अधिकारी पाहून आपणही देशसेवा करावी हे स्वप्न मी पाहिलं होत ते पूर्ण केलंय. याचे सारे श्रेय माझ्या आईला आणि मोठे बंधू यांना जाते. आईच्या कष्टाचे सार्थक झाले, याचा खूप आनंद होतो आहे. मला पोलीस दलात काम करण्याची संधी मिळतीय. त्याचा सदुपयोग करून इतर मुलांना प्रेरणा देईन. मनात जिद्द आणि कष्ट करण्याची चिकाटी असेल तर साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात, असं सुनील गोर्डे सांगतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या