JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस, पण मराठवाड्यात भयावह परिस्थिती, Video

राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस, पण मराठवाड्यात भयावह परिस्थिती, Video

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी मराठवाड्यातील शेतकरी हतबल झालाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी मराठवाड्यात मात्र पावसानं दडी मारलीय. सुरूवातीला झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं पेरणी केली. आत्तापर्यंत मराठवाड्यातील 86 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागानं दिलीय. त्याचवेळी अपुऱ्या पावसानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी कमी पावसामुळे चांगलेच त्रस्त झालेत. आमच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. दुबार पेरणीनंतरही पाऊस आला नाही तर आम्ही काय करावं? आम्ही पूर्ण हतबल झालो आहोत, अशी भावना शेतकरी ईश्वर सपकाळ यांनी व्यक्त केलाीय.

आमच्याकडे पाऊस नसल्यामुळे आम्हाला दुबार पेरणी करावी लागलीय. आमची आजवरची मेहनत वाया गेलीय. शेतीत धान्य उगवलं नाही तर आम्ही सावकाराचं कर्ज कसं फेडणार? आमच्या मुलांचं शिक्षण कसं करणार हा मोठा प्रश्न आहे. जनावरांना चारा देण्यासाठीही आमच्याकडं काही नाही. आमच्या प्रश्नाकडं सरकारनं लक्ष द्यावं, अशी अपेक्षा शेतकरी मधू वाकचौरे यांनी व्यक्त केलीय. कृषी विभागाचं स्पष्टीकरण ‘यावर्षी जून महिन्यामध्ये पाऊस कमी होता. मात्र जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मराठवाड्यात सर्वाधिक पेरण्या लातूर जिल्ह्यात झाल्या असून त्यानंतर संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये झाल्या आहेत. कमी साहित्यात झटपट तयार करा दही धपाटे, अस्सल मराठवाडी पदार्थाची पाहा Recipe

आतापर्यंत मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत 84 टक्के पेरणी करण्यात आलीय. पुढच्या आठवड्यात 95 टक्के पेरण्या पूर्ण होतील. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणीची करण्याची गरज नाही,’ असा दावा कृषी विभागीय अधिकारी रमेश जाधव यांनी केलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या