JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हातमागावर विणलेल्या कपड्यांची करा खरेदी, हॅण्डलूम एक्स्पोमध्ये आहे सुवर्णसंधी!

हातमागावर विणलेल्या कपड्यांची करा खरेदी, हॅण्डलूम एक्स्पोमध्ये आहे सुवर्णसंधी!

छत्रपती संभाजीनगरमध्ये हॅण्डलूम एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही वेगवगेळ्या वस्तूंची खरेदी करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर 27 मे :  छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सेवन हिल भागामध्ये हॅण्डलूम एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. हा हॅण्डलूम एक्स्पो 5 जून पर्यंत शहरातील नागरिकांसाठी खुला असणार आहे. या हॅण्डलूम एक्स्पोमध्ये हातमागावर विणलेल्या कपड्यांचे प्रदर्शन भरण्यात आलेले  आहे. काय करता येईल खरेदी? यामध्ये तुम्हाला कपड्यांपासून ते ज्वेलरी पर्यंत सर्व वस्तू उपलब्ध आहेत. या वस्तू तुम्ही कमी दरामध्ये खरेदी करू शकतात. या हॅण्डलूम एक्स्पोमध्ये देशभरातून विक्रेत्यांनी सहभागी घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला हँडमेड कपडे, साडी, ओढणी आणि शर्ट यांचा वेगवेगळे कलेक्शन बघायला भेटतील.

कोणते आहेत कपड्यांचे प्रकार? साडी - इराकल, सिल्क पैठणी, खादी साडी, मदुराई पॅटर्न, केरळ पॅटर्न, नारायण पेठ, गडवाल कॉटर्न, कॉटन साडी, सिल्क साडी, बनारस साडी इथे उपलब्ध आहेत. या सर्व साड्यांची किंमत 500 रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत आहे. कुर्ती - पंजाबी कुर्ती, हॅण्डलूम कुर्ती, फुलकरी सूट, ड्रेस मटेरियल, लाँग कुर्ती, शॉर्ट कुर्ती या ठिकाणी आहेत. याची किंमत 200 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंत आहे.

मुंबई नव्हे हा आहे संभाजीनगरचा चोर बाजार, TV घ्या 12 हजारात, असं काय आहे तिथे? VIDEO

संबंधित बातम्या

शर्ट - खादी शर्ट, लाँग कुर्ता,  हॅण्डलूम कुर्ता, कॉटन शर्ट जिजाऊ कॉटन शर्ट आहेत. याची किंमत 300 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंत आहे. बेडशीट- हरियाणा बेडशीट, मेरठ बेडशीट, कॉटन बेडशीट, हॅण्डलूम बेडशीट उपलब्ध आहेत. याची किंमत 200 पासून ते 500 रुपयांपर्यंत आहे. ज्वेलरी- कानातेल, मोत्याचे हार, ऑक्सीदाइज् ज्वेलरी, रिंग, सिल्व्हर, गोल्ड , झूमके, ब्रासलेट, अंक्लेट उपलब्ध आहेत. याची किंमत 10 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या