JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महिलांनो, चाळीसीनंतरही सुदृढ राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

महिलांनो, चाळीसीनंतरही सुदृढ राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

चाळीशी ओलांडल्यानंतर आयुष्यातील एक नवा टप्पा सुरू होतो. या टप्प्यात महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 28 जुलै : घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेण्याचं त्यांना सर्वांशी जोडण्याचं काम हे घरातील महिला करत असतात. घरातील कामांसोबतच नोकरी आणि व्यवसायामध्येही महिला आघाडीवर आहेत. या सर्व पातळ्यांवर धावपळ करत असताना अनेकदा महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडं दुर्लक्ष होते. चाळीशी ओलांडल्यानंतर आयुष्यातील एक नवा टप्पा सुरू होतो. या टप्प्यात महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? विशेषत: त्यांचा आहार कसा असावा? याची माहिती छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी दिली आहे. कसा असावा आहार? या महिलांच्या आहारात फायबर, प्रोटीन असणारे घटक तसंच पालेभाज्या यांचा समावेश हवा. मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावं तसंच मनुके चघळून खावेत. त्यामुळे इम्युनिटी वाढते.   एक गाजर, आवळा आणि बीट रस हे पदार्थ  तुम्ही सकाळी नाष्टानंतर सूप म्हणून पिऊ शकता. त्याचबरोबर एक टोमॅटो सालीसह खावे. त्याचे सूपही तुम्ही पिऊ शकता. त्याचबरोबर कोथिंबिरचा सूपही इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे, असं कर्णिक यांनी सांगितलं.

दररोज तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. कॅल्शियम असणाऱ्या घटकांचे प्रमाण आहारामध्ये जास्त असावे. त्यासाठी तुम्ही रोज दूध पिऊ शकता. या दुधामध्ये एक चमचा खारीक पावडर टाकली तर हाडांचा त्रास कमी होतो,असंही त्यांनी सांगितलं. उपवासाचा डोसा खाल्ला आहे का? पाहा झटपट बनवण्याची सोपी रेसिपी, Video तुम्हाला थकवा जाणत असेल तर दोन खजूर हे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी पाण्यासकट ते खजूर खावे. त्याचबरोबर आहारामध्ये जास्तीत जास्त कडधान्य आणि नाचणीचा समावेश हवा. त्याचबरोबर रोज फळ आवर्जुन खावे किंवा फळाचा रस घ्यावा. हा आहार चाळीसीनंतर महिलांनी ठेवला तर त्याचा फायदा होईल, असे कर्णिक यांनी स्पष्ट केला. (टीप : या बातमीतील मत ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या