JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Teen runs away for love : प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलांचं घरातून पलायन वाढलं; धक्कादायक आकडेवारी; काय आहेत कारणं?

Teen runs away for love : प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलांचं घरातून पलायन वाढलं; धक्कादायक आकडेवारी; काय आहेत कारणं?

Teen runs away for love : चौदाव्या वर्षीच प्रेम प्रकरणातून मुलं घरातून पलायन करत असल्याची धक्कादायक आकडेवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. मागील 6 महिन्यांमध्ये तब्बल 134 मुले पळून गेली आहेत.

जाहिरात

प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलांचं घरातून पलायन वाढलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 11 जुलै : एकमेकांच्या प्रेमात पडणे, त्यातून कुटुंबीयांचा विरोध पत्करून घर सोडून पळून जाणे. या आणि असे अनेक प्रसंग चित्रपटात किंवा रोजच्या जीवनात अनुभवायला मिळत आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात अशा प्रकरणांची चर्चा अधिक वाढली आहे. कारण मागील 6 महिन्यात 134 अल्पवयीन मुलामुलींनी घरातून पलायन केलंय. यात मुलींची संख्या 95 इतकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेऊन त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा अस मत मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केलं. अल्पवयीन मुलांचं घरातून पलायन गेल्या काही दिवसांमध्ये शहरात घडलेल्या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली आहे. शहरातील एका मुलीची सोशल मीडियावर भुवनेश्वर येथील मुलासोबत ओळख झाली. महिन्याभराच्या ओळखीवर तिने थेट भुवनेश्वर गाठले. दुसऱ्या घटनेत पंधरा वर्षीय मुलीने एकतर्फी प्रेमातून अहमदाबादहून थेट छत्रपती संभाजीनगर गाठले आणि पोलिसांना प्रियकर शोधून देण्याची मागणी केली. तर तिसऱ्या घटनेत 12 वर्षीय मुलीने इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमापोटी पुण्याहून थेट छत्रपती संभाजीनगरातील वाळूज गाठले. यात पोलिसांनी वेळीच कुटुंबीयांना बोलावून मार्गदर्शन केले. मात्र, या अशा अनेक घटना देशात घडत असल्याने मुलांसाठी काबाडकष्ट करणाऱ्या पालकांची चिंता करायला भाग पाडणाऱ्या आहेत. 2020 मध्ये 97 प्रकरण दाखल 86 उघड 2021 मध्ये 112 प्रकरण दाखल 108 उघड 2022 मध्ये 158 प्रकरण दाखल 144 उघड 2023 जूनपर्यंत 134 प्रकरण दाखल 89 उघड काबाडकष्ट करून वाढविणाऱ्या आईवडिलांपेक्षा सध्या मुला मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रीणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले. यातच सर्वाधिक प्रमाण हे मुलींना पळवून नेण्याचे आहेत. त्यांना पळवून नेणारे मोठे असतात. परंतु, कमी वयातील असमज, आकर्षण, वेब सिरीज, मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांमधील सहनशीलता संपत चालली आहे, असे निरिक्षण तज्ञांनी नोंदवले आहे. अशा प्रकारच्या 3 घटना मागील आठवड्यात घडल्याचे समोर आलंय. वाचा - 10 वीच्या मुलीवर घरात घुसून अत्याचार, पत्र्याच्या शेडमध्ये गर्भपात, दबाव टाकून.. मागील साडेतीन वर्षांमध्ये तब्बल 501 मुलामुलींनी घर सोडले. धक्कादायक बाब म्हणजे यात 80 टक्के मुली आहेत. 2020 साली 97 मुलामुलींनी घर सोडले, 2021 वर्षात 112, 2022 वर्षात 158 तर 2023 च्या जुन महिन्यापर्यंतच तब्बल 134 मुलामुलींनी घर सोडले आहे. आजकाल बहुतांश आईवडील नोकरीत व्यस्त असतात, कुटुंबात संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने अल्पवयीन मुलं सोशल मीडियाच्या माध्यमातून निरनिराळ्या आमिषांना बळी पडतात. मित्रांकडून अथवा प्रियकराकडून ती पोकळी भरली जात असल्याचा त्यांना भास होतो, यातूनच घर सोडण्याच्या निर्णयापर्यंत त्या येऊन थांबतात. या सर्व घटनांमध्ये मुलींचे घर सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांना पालकांपेक्षा प्रियकर महत्त्वाचा वाटतो. यात आता हे प्रमाण 14 व्या वर्षांपर्यंत आल्याने आई वडिलांनी आपल्या मुलामुलींकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आई वडिलांनी आपल्या मुलामुलींसोबत संवेदनशील विषयावर खुलेपणाणे बोलले आणि घरात मोठ्या प्रमाणात संवाद झाला तर असे प्रकार टळू शकतील असे तज्ञ सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या