JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लेकीला डॉक्टराच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये पाहायचं राहुन गेलं, रिक्षाचालकाच्या मुलीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

लेकीला डॉक्टराच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये पाहायचं राहुन गेलं, रिक्षाचालकाच्या मुलीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

तृप्तीनं अनेक संकटावर मात होऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण….

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै :  कोणतेही स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर ते स्वप्न नक्की पूर्ण होतं. छत्रपती संभाजीनगरच्या तृप्ती मगरेनं हे दाखवून दिलंय. रिक्षा चालकाची मुलगी असलेली तृप्ती अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत डॉक्टर बनलीय. तिचा आजवरचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. कसा झाला प्रवास? छत्रपती संभाजीनगरच्या झोपडपट्टीमध्ये तृप्ती लहानाची मोठी झाली. तिचे वडिल रिक्षा चालक तर आई गृहिणी होती.  घरची परिस्थिती बेताची. ती राहते त्या भागातील लोकांना शिक्षणाबद्दलही फारशी माहिती नव्हती. या खडतर परिस्थितीमध्ये तृप्तीला शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं. ती शाळेतल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली. या स्पर्धांची तयारी करताना तिनं अनेक महापुरुषांवरील पुस्तकं वाचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातून तृप्तीला नवी प्रेरणा मिळाली.

पहिली ते दहावी चांगले मार्क्स मिळवलेल्या तृप्तीनं बारावीनंतरच्या नीट परीक्षेतही चांगले मार्क्स मिळवले. त्यावेळी आई-वडिलांनी मला डॉक्टर होण्यासाठी प्रोत्साहन दिलं, असं तृप्ती सांगते. छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये तृप्तीचं शिक्षण झालं. कॉलेजच्या काळात शिक्षणाचं साहित्य मागवण्यासाठी घरी फोन करायलाही अनेक वेळा विचार करावा लागत असे, असं तिनं सांगितलं. डॉक्टर झाली पण… तृप्ती नुकतीच एमबीबीएस झालीय. पदवीदान समारंभामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आले होते. पण, तृप्तीला डॉक्टर होण्यासाठी जिनं सर्वाधिक प्रोत्सहान दिलं त्या तृप्तीच्या आईचं निधन झालं होतं. ‘या पदवीदान समारंभामध्ये आई नसल्याची उणीव कधीही भरुन येणार नाही, अशी भावना तिनं व्यक्त केली. आता घरीच तयार करा प्रदुषणमुक्त इंधन, पुणेकर महिलेचं भन्नाट संशोधन ‘तृप्ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिनं कधीही कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. ती आज डॉक्टर झालीय पण हे पाहण्यासाठी तिची आई नाही, तिची कमतरता आम्हाला भासत आहे, असं तिचे वडील मिलिंद मगरे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या