JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : महाराष्ट्रातल्या या गावात फक्त 75 घरं अन् 50 पेक्षा जास्त मुलं आहेत सरकारी अधिकारी, SPECIAL REPORT

Chhatrapati Sambhaji Nagar News : महाराष्ट्रातल्या या गावात फक्त 75 घरं अन् 50 पेक्षा जास्त मुलं आहेत सरकारी अधिकारी, SPECIAL REPORT

महाराष्ट्रातील या गावात फक्त 75 घरं आहेत. पण, त्यापैकी 50 घरातील मुलं ही सरकारी अधिकारी आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजय चिडे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 26 जून :  प्रत्येक गावाचं एक खास वैशिष्ट्य असतं. त्या वैशिष्ट्यामुळे त्याची सर्वत्र ओळख असते. काही गावं निसर्गसंपन्न वारशासाठी तर काही मानवनिर्मित गोष्टींसाठी प्रसिद्ध असतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं एक गाव सरकारी नोकरदारांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात फक्त 75 घरं आहेत, त्यापैकी 50 पेक्षा जास्त घरातील मुलं वेगवेगळ्या सरकारी नोकरीत काम करतात. पैठण तालुक्यातील सानपवाडी असं या गावाचं नाव आहे. या गावाची 400 लोकसंख्या आहे. त्यामध्ये एक उपविभागीय अधिकारी, एक सहाय्यक पोलीस निरिक्षक, एक पोलीस निरीक्षक, 23 पोलीस कर्मचारी, पाच शिक्षक आणि सहा जण भारतीय सैन्य दलात आहेत. त्याचबरोबर पाच इंजिनिअर आणि सहा डॉक्टर देखील या गावात आहेत. या गावात पाण्याचा दुष्काळ असला, तरी गुणवत्तेच्या बाबतीत पुढारलेले आहे. या गावाला अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जात होते.

गेल्या काही वर्षांपासून अधिकारी होण्याची परंपरा निर्माण झाली आहे. वर्षी पोलिस भरती असो किंवा शिक्षक भरती या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या गावातील कोणाची निवड झाली, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागून असते.सानपवाडी येथे विशेष म्हणजे इथं घरटी एक अधिकारी, कर्मचारी आहे. गावात जन्म घेतला, की मुलगा असो वा मुलगी पुढे जाऊन अधिकारी होणार हे नक्कीच, असं ग्रामस्थ मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. काय आहे कारण? सानपावडी गावातील मुलांना प्राथमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा देण्यात येते. वेगवेगळ्या प्रश्नमंजुषेचे कार्यक्रम शाळेत राबवले जातात. तालुका आणि जिल्हा पातळीवरील प्रश्नमंजूषा स्पर्धेची तयारीही शाळेत घेतली जाते. या गावातील विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवतात. सर जाऊ नका, शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर VIDEO शाळेत पाया तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातही स्पर्धा परीक्षेची गोडी लागते. कोणत्याही शाखेची पदवी मिळाली तरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या गावात तसं वातावरणच तयार झालंय. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या गावातील विद्यार्थी अभ्यास करत आहेत. या परीक्षेत यश मिळालेले विद्यार्थी आणखी यश मिळवण्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांचं गाव, अशी या गावाची ओळख झालीय, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या