JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आंब्यावरील रोगाची वेळीच घ्या काळजी! 'या' पद्धतीनं करा तातडीनं उपाय, Video

आंब्यावरील रोगाची वेळीच घ्या काळजी! 'या' पद्धतीनं करा तातडीनं उपाय, Video

आंब्याच्या बागांमध्ये तुडतुडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. हा दूर करण्यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झाले आहेत. अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेताचे मोठे नुकसान झालं आहे. अशातच आता फळबागांमध्ये देखील याचे परिणाम जाणवत आहेत. आंब्याच्या बागांमध्ये तुडतुडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यासोबतच बोरांच्या आकाराची झालेली आंबे हे गळून पडायला लागल्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे आंब्यावरील रोगराई कशी कमी करावी आणि फळांचा आकार कसा वाढवावा या संदर्भात  छत्रपती संभाजीनगर मधील फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. तीन टप्प्यात करा उपाययोजना  आंब्यांचा फळबागांमध्ये शेतकऱ्यांनी तीन टप्प्यांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे. सध्या तापमान वाढले आहे यामुळे बागेला थोडे पाणी सुरु ठेवायचे आहे. सध्या आद्रता कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आद्रता निर्माण झाल्यामुळे फळांचा आकार वाढण्यास मदत होते.

फवारणी करा तुडतुडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर यासाठी प्रति दहा लिटर ॲक्टरा किंवा तीन ग्रॅम इमिडा अधिक त्यामध्ये 22-3-10 ग्रॅम अधिक 200 ग्रॅम युरिया अशी फवारणी करणे आवश्यक आहे. दोन ते तीन फवारण्या बारा ते पंधरा दिवसांच्या अंतराने कराव्यात. या दरम्यान पाऊस पडला तर फवारणी पुन्हा करावी.

राज्यात अद्यापही कमी दाबाचा पट्टा सक्रीय, 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

फळांना बँगिंग करावे

संबंधित बातम्या

वातावरण झालेल्या बदलामुळे फळांचा आकार कमी होऊ शकतो. यासाठी झाडावर असलेल्या फळांना बँगिंग करावे. फळावर 0-0 50 च्या आठ ते दहा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे दोन ते तीन फवारण्या बारा दिवसाच्या अंतराने कराव्यात. यामुळे फळांचा आकार रंग व फळाला चकाकी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होईल, असं भगवानराव कापसे सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या