JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar : 8 मिनिटात होणार एक एकरात फवारणी, शेतकऱ्याने केली ड्रोनची खरेदी, काय आहेत आणखी फायदे?

Chhatrapati Sambhaji Nagar : 8 मिनिटात होणार एक एकरात फवारणी, शेतकऱ्याने केली ड्रोनची खरेदी, काय आहेत आणखी फायदे?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ड्रोनची खरेदी केली असून या ड्रोनच्या माध्यमातून आठ मिनिटात एक एकरावर फवारणी होते. आणखी काय फायदे आहेत पाहा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजय चिडे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 22 जून : पाठीवर फवारा घेऊन दिवसेंदिवस फवारणी करायची म्हटले की शेतकऱ्यांना त्रास होतो. त्यात पाऊस आला, शेतात चिखल झाला की फवारणी रद्द करावी लागते. वेळेत फवारणी न झाल्यास रोग वाढून उत्पादन क्षमता घटण्याचा धोका असतो. पण आता यावर ड्रोनद्वारे फवारणीचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ड्रोनची खरेदी केली असून या ड्रोनच्या माध्यमातून आठ मिनिटात एक एकरावर फवारणी होते त्यासोबतच कीटकनाशकाची बचतही होते. पारंपारिक शेती अवजारांना फाटा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या चांगतपुरी येथील तरुण शेतकरी दामोदर खेडकर याने पारंपारिक शेती अवजारांना फाटा देत आधुनिक अवजारं विकत घेतली आहेत. पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यासाठी प्राधान्य दिलं आहे. या ड्रोनच्या माध्यमातून आठ मिनिटात एक एकरावर फवारणी होते त्यासोबतच कीटकनाशकाची बचतही होत आहे.

शेतकरी दामोदर खेडकर यांनी आपल्या एक एकर शेतात ड्रोन फवारणीचा प्रयोग केला आहे. त्यांना या फवारणीसाठी अवघ्या आठ मिनिटांचा कालावधी लागला आहे. एसटीपी म्हणजे पाठीवर घेऊन इंधनावर चालणाऱ्या फवारा यंत्राने फवारणी करायची असेल तर चार एकरासाठी 1 तास वेळ लागतो.

Kolhapur News : गौराई आमची लाडाची गं, शेतकऱ्यानं घातलं गाईचं डोहाळे जेवण, VIDEO

संबंधित बातम्या

औषधांची बचत ड्रोनसाठी 500 मिली प्रति एकर औषधाचा वापर होता तर एसटीपीद्वारे 1000 मिली प्रति एकर औषध लागते. यावरून हे लक्षात येते की ड्रोनद्वारे फवारणी केली तर वेळ आणि औषधांची बचत होते. ड्रोनद्वारे शेतकरी 50% खर्च वाचवू शकतात. शेतीसाठी हे तंत्रज्ञान नवीन असून आधुनिक पद्धतीने होत असलेली फवारणी पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती, अशी माहिती शेतकरी दामोदर खेडकर यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या