प्रमोद पाटील, खारघर, 18 सप्टेंबर : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. हे सरकार स्थापन होवून आतापर्यंत अडीच महिने झाले आहेत. या अडीच महिन्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी समोर येत आहेत. विशेष म्हणजे हे सरकारच राजकीय उलथापालथमधून निर्माण झालं आहे. त्यानंतरही राजकीय घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींनंतर आज नवी मुंबईतील खारघर शहरात एक घटना समोर आली आहे. खारघर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते रुपेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण आणि धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश पाटील यांच्यावर आपल्याच इमारतीमधील एका व्यावसायिकाला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉप बाहेर लावलेले वाहन काढण्यास नकार दिला म्हणून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुपेश पाटील यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने कानाखाली मारली आसल्याची तक्रार करण्यात आळी आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे.
( राज विदर्भात, अमित मुंबईत, मनसेमध्ये वेगवान घडामोडी, इंजिनात भाजपला जागा नाही? ) रुपेश पाटील यांच्याविरोधात कलम 452, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे रुपेश पाटील यांनीही व्यवसायिक मनीष तिरपिट यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणी नेमकं काय घडलंय याचा तपास पोलीस करत आहेत.