JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जन्मदात्या आईला तान्हुली नकोशी; पोटच्या मुलीला रुग्णालयात टाकून आई फरार, घटना CCTV मध्ये कैद

जन्मदात्या आईला तान्हुली नकोशी; पोटच्या मुलीला रुग्णालयात टाकून आई फरार, घटना CCTV मध्ये कैद

मुलगी नकोशी झाल्याने तिला रुग्णालयात ठेवून आईने पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात

जन्मदात्या आईला तान्हुली नकोशी; पोटच्या मुलीला रुग्णालयात टाकून आई फरार, घटना CCTV मध्ये कैद

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 26 नोव्हेंबर : आजही समाजात मुलींना नाकारलं जात असल्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. मुलगी नकोशी झाल्याने जन्मदात्या आईने तिला रुग्णालयात टाकून पळ काढल्याचा (mother left daughter in hospital and run away) धक्कादायक प्राकर समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana district) ही घटना समोर आली आहे. मुलीला रुग्णालयात टाकून पळ काढणारी ही महिला रुग्णालयाच्या सीसीटीव्ही (Buldhana incident caught in cctv) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जवळपास एक महिना वय असलेल्या मुलीला रुग्णालयात टाकून एक अज्ञात महिला फरार झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी समोर ही ‘नकोशी’ टाकण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे ज्या महिलेने नकोशीला टाकले, ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे तिचा शोध लवकरच लागेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या महिलेने रुग्णालयातील ब्लड बँकेजवळ नकोशीला टाकण्यात आले होते. ड्युटीवर असलेल्या काळवाघे सिस्टरला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांचे लक्ष गेले. त्यांनी या नकोशीच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कुणीच आढळले नाही. काळवाघे सिस्टर यांनी सदर बाब वैद्यकीय अधिकारी डॉ. राधा भानुसे यांना सांगितली. डॉ. भानुसे यांनी पोलिसांना लेखी तक्रारीद्वारे ही घटना कळविली असून पोलीस कैलाश जाधव या मातेचा शोध घेत आहेत. एका महिन्याच्या या नकोशीला नवजात शिशु उपचार कक्षात ठेवण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून नकोशीच्या मातेचा शोध घेतला जात आहे. वाचा :  नात्याला काळिमा! आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य जन्मजात बाळाला दोन डोकं, जन्मदात्यांनीच रुग्णालयातून काढला पळ झारखंड च्या रिम्समधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जिथे एक निर्दयी आई आपल्या तान्ह्या बाळाला जन्म देऊन पळून गेली आहे. दोन डोकं असलेलं बाळ जन्माला आल्यानं ही जन्मदाती आईनं रुग्णालयातून पळ काढला आहे. असे सांगितले जात आहे की, मुलाला जन्मापासूनच ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल या आजाराने ग्रासलं आहे. या आजारात डोक्याचा मागचा भाग बाहेर येऊन थैलीसारखा होऊन तो दोन डोक्यांसारखा दिसतो. तसंच हा भाग मेंदू आणि त्वचेलाही जोडलेला असतो. अशा बाळाला पाहून घरातील कुटुंबीयांनी त्याला गुपचूप रिम्समध्ये सोडून पळ काढला. याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधला. तपासात पत्ता बनावट असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर डॉक्टरांच्या टीमने त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी चालवलेली एनजीओ त्या बाळाची काळजी घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या