JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : म्हाडा भरतीच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर, आता ऑनलाइन असणार पेपर!

BREAKING : म्हाडा भरतीच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर, आता ऑनलाइन असणार पेपर!

रद्द झालेली म्हाडा भरती परीक्षेची तारीख अखेर ठरली आहे. 1- 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान ही परीक्षा होणार आहे

जाहिरात

म्हाडा सरळसेवा भरती 2021परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 20 डिसेंबर : ऐन परिक्षेच्या आदल्या रात्री म्हाडाच्या परीक्षाचा (mhada recruitment 2021 exam) पेपर फुटला होता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली होती. त्यानंतर आता हीच परीक्षा 1 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पण, यंदा ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. रद्द झालेली म्हाडा भरती परीक्षेची तारीख अखेर ठरली आहे. 1- 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान ही परीक्षा होणार आहे. कंत्राटी एजन्सीचा संचालक प्रीतिश देशमुख हा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असतानाच पुणे पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली होती. त्यामुळे 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीच म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. तीच परीक्षा आता फेब्रुवारीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दरम्यान, म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अन्य दोघांना अटक केली असून सर्व आरोपी कोठडीत आहे.  एजंट्सकडून आलेल्या परीक्षार्थींना पास करण्यासाठी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख यानं वेगळंच प्लॅनिंग केलं होतं. आरोपीला परीक्षार्थींकडून प्रत्येकी 10 लाख रूपये मिळणार होते. याप्रकरणात राज्यभरातील आणखी 10 एजंट्सची नावं समोर आली असून सायबर पोलीस त्यांचा तपास करत आहेत. कतरिनाला सोडून विकी कौशल इंदूरला रवाना, पण काही तासाताच पत्नीची… खरंतर, अलीकडेच आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरण राज्यभर गाजलं आहे. हे प्रकरण ताजं असतानाही जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आणि मुख्य आरोपी देशमुख यानं म्हाडा पेपर फोडण्याचं धाडस केलं. त्यासाठी राज्यभरातील 10 एजंट्सकडून त्याला कोट्यवधी रूपये मिळणार होते. एजंट्सकडून म्हाडाच्या परिक्षेत बसलेल्या परीक्षार्थींना उत्तरपत्रिका चक्क कोरी ठेवण्याचा सल्ला देशमुख यांच्याकडून देण्यात आला होता. साताऱ्यात नगरपालिका निवडणुकीआधीच दोन राजेंमधील संघर्ष पेटला उत्तरपत्रिका तपासणी करत असताना एजंट्समार्फत आलेल्या परिक्षार्थींना ओएमआरशीटमध्ये (उत्तरपत्रिका) थेट गुण देऊन त्यांना पास करण्यात येणार होतं. याप्रकरणी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) याला अटक केली. सर्व आरोपींची चौकशी सुरू असून कोठडीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या