JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजप नगरसेवकाने अधिकाऱ्याला चोपले, खड्ड्यात ढकलून देण्याचा केला प्रयत्न, VIDEO

भाजप नगरसेवकाने अधिकाऱ्याला चोपले, खड्ड्यात ढकलून देण्याचा केला प्रयत्न, VIDEO

भुसावळ येथे शहरातील प्रभाग क्र. 20 मध्ये अमृत योजनेच्या कामासाठी गेल्या 8 दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खड्डा करण्यात आला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 25 डिसेंबर :  अधिकाऱ्यांना हात जोडून देखील दखल न घेतल्यामुळे भाजपचे (BJP) नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावून चोपही दिला. या घटनेमुळे भुसावळमध्ये खळबळ उडाली आहे. भुसावळ येथे शहरातील प्रभाग क्र. 20 मध्ये अमृत योजनेच्या कामासाठी गेल्या 8 दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खड्डा करण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील दोन तीन नागरिक या गड्यांमध्ये पडले होते. त्यामुळे हे काम तातडीने करून खड्डा बुजवावा अशी विनंती येथील स्थानिक सत्ताधारी भाजप पक्षाचे नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी 3 दिवसांपूर्वी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना केली होती.

मात्र, अधिकाऱ्यांना हात जोडून देखील दखल न घेतल्याने नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना या गड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करून कानशिलात लगावून चोप दिला. 3 दिवसापूर्वी प्रभाग क्र. 20 चे महेंद्र सिंग ठाकूर यांनी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती केली होती. तसंच तातडीने काम करून खड्डा बुजवण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज अमृत योजनेच्या या अधिकाऱ्याला खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न महेंद्र सिंग ठाकूर यांनी  केला. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, यापूर्वीही महेंद्र सिंग ठाकूर यांनी आपल्या प्रभागातील कामं होत नसल्याने आपली किडनी विकायला काढून भाजपला घरचा अहेर देत खळबळ उडवून दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या