जळगाव, 03 मार्च : आजपासून आदिवासी समाजाच्या सर्वात मोठया भोंगऱ्या बाजाराला सुरवात झाली असून आदिवासी पावरा बांधवांमध्ये उत्साह संचारला आहे. भोंगऱ्या बाजार भरल्यानंतर होळीला सुरवात होत असते. या बाजाराला जुनी परंपरा आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या भोंगऱ्या बाजाराला उपस्थित राहतात. आदिवासी पावरा बांधवांसाठी पर्वणी ठरणाऱ्या होळी सण व त्याआधी सुरू होणाऱ्या भोंगऱ्या बाजाराला आजपासून सुरुवात होत आहे.
त्यानिमीत्ताने सातपुड्याच्या पायथ्याशी भोंगऱ्याचा ढोल पुढील आठवडाभर निनादणार असून त्याची जोरदार तयारी आदिवासी पावरा बांधवांनी केली असून भोंगऱ्याच्या आगमनाने या बांधवांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील जामुन झिरा (पावरा) बांधवाचे सातपुड्यालगत मोठे वास्तव्य आहे.
Holi 2023: होळीला जागरणाचे महत्त्व, होलिका दहनाच्या रात्री जप व ध्यानाची परंपराया बांधवांसाठी महत्वाचा असा सण म्हणजे होळी.याच होळी आधी आठ दिवस ठिकठिकाणी आयोजीत भोंगऱ्या बाजारांना आज पासून सुरुवात होत असून पुढील आठ दिवस संपूर्ण सातपुड्याच्या पायथ्याशी आदीवासी ढोल निनादणार आहे.
आदिवासी पावरा बांधवाना सर्वांत महत्वाचा व पारंपरिक स्वस्कृतीचे दर्शन घडवणारा उत्सव म्हणजे भोंगऱ्या दिवाळीला जेवढे महत्व असते, त्यापेक्षाही आदिवासी बांधवामध्ये भोंग ऱ्या सणास अनन्यसाधारण महत्व आहे. आपली अनोखी स्वस्कृती चालीरिती ची ओळख या सणातून हे बांधव घडवत असतात.
होलाष्टकातही करू शकाल खरेदी; दागिने-वाहने खरेदीसाठी हे आहेत शुभ मुहूर्तहा सण उत्साहात साजरा करण्यासाठी, पाड्या, वस्त्यावर स्थानिक रहिवाश्यासह बाहेरगावी रहात असलेले पावरा बांधव आपल्या गावी एकत्र येतात व हा सण जल्लोषात साजरा करतात. यंदाही मोठया हासन साजरा होणार असुन त्यामुळे सातपुड्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे .