JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: फक्त 100 रुपयांत करा 'हे' कोर्स आणि कमावा हजारो रूपये, पाहा Video

Beed News: फक्त 100 रुपयांत करा 'हे' कोर्स आणि कमावा हजारो रूपये, पाहा Video

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बीडमध्ये महिलांना विविध कोर्स करण्याची संधी आहे. 100 रुपये फीमध्ये हे कोर्स करून स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 17 एप्रिल: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही शैक्षणिक संस्था विविध उपक्रम आणि कोर्सेसचे आयोजन करत असतात. बीड जिल्ह्यातील शैक्षणिस संस्थांनी उन्हाळ्यात नवनवीन कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. विशेषत: हे कोर्स महिलांसाठी आहेत. अगदी 100 रुपये फीमध्ये हे कोर्स करता येतील. तसेच कमी गुंतवणुकीत स्वयंरोजगार सुरू करता येणार असल्यामुळे महिलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. बीडमधील जनशिक्षण संस्थेकडून कोर्स बीड येथील जन शिक्षण संस्था निरक्षर, नवसाक्षर, प्राथमिक स्वरूपाचे शिक्षण तसेच बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे न शिकलेल्या व्यक्तींसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते. त्यांना कौशल्य विषयी प्रशिक्षण देऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित केले जाते. विविध 11 प्रकारच्या कोर्सेसच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे काम ही जन शिक्षण संस्था मागील अनेक वर्षांपासून करत आहे‌.

स्वयंरोजगाराची संधी जन शिक्षण संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येणारे कोर्स हे काही महिन्यांत पूर्ण होतात. या कोर्समुळे महिलांना घरातूनच स्वयंरोजगार करता येणार आहे. तसेच विविध ठिकाणी नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातात. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विविध कोर्सचे आयोजन केले गेले आहे. या मधील संपूर्ण कोर्स कालावधी साधारणता दोन ते तीन महिन्याचा असून यासाठी दररोज तीन तासाचे प्रॅक्टिकल व एकतास थेरी घेतली जाते. कोर्सेस आणि जागा असिस्टंट ड्रेस मेकर ब्युटी केअर - 20, ब्युटी केअर असिस्टंट - 20, हेल्पर इलेक्ट्रिकल टेक्निशन - 20, हेल्प वायरमन - 20, असिस्टंट फ्रुट आणि व्हेजिटेबल प्रोसेसिंग - 20, डोमेस्टिक केअर अटेंडंट - 20, असिस्टंट झूट क्राफ्ट प्रॉडक्ट मेकर - 20, असिस्टंट हॅन्ड एम्ब्रोईडरी - 20, असिस्टंट कॉम्प्युटर ऑपरेटर - 20, हेल्पर टू/ थ्री व्हीलर मेकॅनिकल - 20, असिस्टंट प्लंबिंग आणि सॅनिटरी वर्क - 20 जॉब आणि स्वयंरोजगाराच्या संधी हे कोर्सेस पूर्ण होताच विविध बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत हे कोर्स केलेल्या अनेक महिला स्वयंरोजगार करत महिन्याकाठी 20 ते 30 हजार रुपयांचे उत्पन्न देखील कमवत आहेत. यातच अनेक नावाजलेल्या कंपन्यांमध्ये देखील काही महिला कार्यरत आहेत. कमी वयात नोकरी मिळवण्यासाठी करा ‘हा’ कोर्स, पाहा कशी आहे प्रवेश प्रक्रिया Video प्रवेशाची प्रक्रिया या कोर्ससाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ग्रामीण भागात व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी भेट देत आहेत. ज्या महिलांना स्वयंरोजगार किंवा नोकरी करण्याची इच्छा आहे, अशा महिलांची संपूर्ण माहिती गोळा करून जनशिक्षण संस्थेला दिली जाते. त्यानंतर त्यांना संपर्क देखील केला जातो. या कोर्ससाठी खुल्या गटातील महिलांना 100 रुपये फी आकारली जाते. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी हा कोर्स मोफत आहे. येत्या 25 ते 30 एप्रिल दरम्यान या कोर्सची पहिली बॅच सुरू होणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे विविध कोर्सना प्रवेश घेण्यासाठी पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी जन शिक्षण संस्था भारतरत्न नानाजी देशमुख उद्यमिता भवन, चक्रधर नगर पांगरी रोड बीड, पिन- 431122 येथे संपर्क करता येईल किंवा 02442-220329 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या