बीड, 21 जुलै : सर्वात मजबूत आणि महागड्या लाकडांमध्ये सागवानाचा समावेश आहे. सागवानापासून फर्निचर, प्लायवूड बनवलं जातं. त्याचबरोबर औषधं बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो. दीर्घकाळ टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे बाजारपेठेत सागवानाची कायम मागणी असते. यापूर्वी जंगली पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागवानाची आता अनेक शेतकरी शेती करतात. बीडचे कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी सागवानाची शेती कशी करावी याबाबत माहिती दिली आहे. कशी करावी लागवड? सागवानाची लागवड करणे अगदी सोपं आहे. त्यासाठी पाण्याचं व्यवस्थापनही फार करण्याची गरज नाही. हे जंगली पिक असल्यानं एकदा लागवड केल्यानंतर थोड्या प्रमाणात देखभाल केली तरी त्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण, अनेकदा या लागवडीचं तंत्र बहुतेक शेतकऱ्यांना माहिती नसतं. चांडक यांनी याची सोपी पद्धत सांगितली आहे.
- सागवान रोपाची लागवड 8 ते 10 फूट अंतरावर करता येते. - एखाद्या शेतकऱ्याकडे 1 एकर जमीन असेल तर तो त्यामध्ये सुमारे 400ते 500 सागवान रोपे लावू शकतो. - 15 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान सागवानासाठी अनुकूल मानले जाते. - ओलसर क्षेत्र मोठ्या प्रमाणात असेल तर सागवानाच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो जातींची निवड भारतीय साग, ऑस्ट्रेलियन साग (आकेशिया मॉंजियम) आफ्रिकन साग बर्मासाग आणि पांढरा साग (शिवण) अशा सागवानाच्या वेगवेगळ्या लागवडीयोग्य जाती आहेत, त्यांपैकी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन साग अधिक प्रचलित आहे भारतीय सागाची लागवड केल्यास तो कापणीयोग्य होण्यासाठी 25 ते 30 वर्षे लागतात. हापूसला द्यायची टक्कर, आताच ठरवा आणि या आंब्याची करा लागवड ऑस्ट्रेलियन साग लागवडीपासून 12 ते 14 वर्षांमध्ये तयार होतो, त्यामुळे या जातीची लागवड अधिक फायदेशीर ठरते. या दोन्ही जातींच्या झाडांच्या लाकडाचा दर्जा चांगला असतो. लागवडीच्या पद्धती बियांची पेरणी : मध्य प्रदेशचे काही भागात व उत्तर महाराष्ट्रात शेतातील खड्ड्यात सागाचे बी पेरतात. एका खड्ड्यात 2 किंवा 3 बिया टोकतात. पण या पद्धतीत सागाची बारीक रूपे मरतात व अनेक ठिकाणी गॅप (तुटाळ) पडतात. रोपांची / कलमांची लागवड : महाराष्ट्र, मध्य प्रदेशात काही भाग आणि ओरिसातिल शेतात सागाची रोपे लावतात. सागाची रोपे रानात (टोपलीत) तयार करतात किंवा नर्सरीतून आणतात. ही रोपे 3 – 4 महिने वयाची आणि 30 सें.मी. उंच वाढलेली शेतात लागवडीसाठी योग्य होतात, असं चांडक यांनी स्पष्ट केलं.